पुणे

Pune Crime : तोतया लष्करी अधिकारी पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद

अमृता चौगुले

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर फिरणार्‍या तोतया लष्करी अधिकार्‍याला रेल्वे सुरक्षा बल आणि गुप्तचर यंत्रणेकडून शनिवारी (दि. 2) जेरबंद करण्यात आले. लष्करी गणवेशात फिरणारा तोतया असल्याचे या वेळी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. तसेच, त्याने लष्करी गणवेशात 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पासशिवाय प्रवेश केल्याचेदेखील समोर आले आहे.

नीरज विक्रम विश्वकर्मा (वय 20, रा. लटेरा, उत्तर प्रदेश) असे या तोतयाचे नाव आहे. रेल्वे राखीव दलाचे पी. के. यादव, अशोक चांदूरकर यांना एक लष्करी अधिकारी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी विश्वकर्माकडे चौकशी केली. तेव्हा त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्याच्या गणवेशावर नेमप्लेट, पॅरा बॅच, लेफ्टनंट असल्याचे बॅच आढळून आले. लष्करी गुप्तचर अधिकार्‍यांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT