पावसामुळे लोणावळामध्ये हेलिकॉप्टरचं आपातकालीन लँडिंग; व्हिडिओ नेमका कधीचा? Pudhari
पुणे

Fact Check: पावसामुळे लोणावळामध्ये हेलिकॉप्टरचं आपातकालीन लँडिंग; व्हिडिओ नेमका कधीचा?

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

प्रसाद जगताप

helicopter emergency landing fact check

पुणे/पौड: पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सालतर गावात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे एका हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्राप्त माहितीनुसार, लोणावळ्याच्या दिशेने प्रवास करणारे हे हेलिकॉप्टर अचानक बदललेल्या हवामानामुळे संकटात सापडले. या दोन पायलेट व चार जण होते, 15 ऑगस्टच्या दिवशी ही घटना घडली. (Latest Pune News)

लोणावळा आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली आहे. हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला समोरचे काहीही दिसत नसल्याने आणि सुरक्षित प्रवासासाठी पर्याय नसल्यामुळे, त्यांनी तात्काळ जवळच्या मोकळ्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक एक हेलिकॉप्टर खाली उतरताना दिसले. काही क्षणातच ते जमिनीवर उतरले. हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना सुरक्षित पाहून ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT