पुणे

‘एक्स्प्रेस वे’ला तडे की भगदाडे? प्रवाशांची सुरु आहे जीवघेणी कसरत

अमृता चौगुले

प्रसाद जगताप

पुणे :  नव्यानेच तयार करण्यात आलेल्या 'एक्स्प्रेस वे'ला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे 'एमएसआरडीसी'कडून सिमेंट रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) नव्याने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेची निर्मिती करण्यात आली आहे.

मात्र, येथील सिमेंटच्या रस्त्याला जागोजागी तडे गेले आहेत. अलीकडील काही वर्षांतच या रस्त्याची ही दुरवस्था झाल्यामुळे येथील रस्त्याचा दर्जा कसा आहे, हे स्पष्ट होत आहे. दैनिक 'पुढारी'च्या प्रतिनिधीने शनिवारी पुणे ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करून पाहणी केली. एक्स्प्रेस वेवर बर्‍याच ठिकाणी तडे गेले आहेत. तेथे रस्ता दुरुस्तीचे काम आम्ही हाती घेतले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच येथे होणार्‍या वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कामे करण्यात येत आहेत.

असे 'एमएसआरडीसी'च्या अधिकार्‍यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले. वेळी या मार्गाची विदारक स्थिती पाहायला मिळाली. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याला तडे गेले आहेत. काही ठिकाणी एमएसआरडीसीकडून रस्ते दुरुस्ती करण्याची कामेदेखील हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून, विकेंडला या एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

क्रमशः

या ठिकाणी आहेत कामे सुरू…

  •  तळेगाव टोल नाक्यापुढे तीन ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे.
  •  कार्ले गाव परिसरात पाच ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याला तडे गेले असून, येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे.
  •  गहुंजे गाव आणि कार्ले गाव परिसरात एक्सप्रेस वेचे रुंदीकरण काम सुरू आहे.
  •  लोणावळा भागात तीन ठिकाणी सिमेंट रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे, तसेच येथे काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.
SCROLL FOR NEXT