पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मिळकतकर माफ करावा, अशी मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत लक्षवेधीव्दारे उपस्थित केली. आमदार सुनील टिंगरे आणि आमदार सुनील कांबळे यांनीही या मागणीला समर्थन दिले. रिक्षाचालक, घरकाम करणार्या महिला तसेच कनिष्ठ मध्यम वर्ग हे प्रामुखाने 500 स्केअर फुटाच्या घरांमध्ये राहतात. शहराची वाढ होत असताना अनेक उपनगरे, लगतची गावे समाविष्ट झाली आहेत. यामध्ये छोट्या मिळकतींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकतकरामधून पूर्ण सूट देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिका हद्दीमधील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कारमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली.
या वेळी आ. कांबळे यांनी महापालिका हद्दीतील पाचशे चौरस फुटापेक्षा कमी असलेल्या सदनिकाधारकांना करमाफी देण्यात येणार का? हा प्रश्न उपस्थित केला. तसेच महापालिकेने वापरासाठी व भाड्याने ज्या मिळकती दिलेल्या आहेत. त्यांचा थकीत कर वसूल करण्यासाठी पालिकेकडे कुठली यंत्रणा आहे की नाही? हा प्रश्नदेखील उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात अहवाल मागवून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर दिले आहे.
हे ही वाचा :