EVM Aarti Controversy Pune Pudhari
पुणे

Pune VIDEO: पुण्यातील भोरमध्ये EVM मशीनची हळद कुंकवाने केली पूजा; केंद्र प्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

EVM Aarti Controversy Pune: भोर नगरपरिषदेत मतदान सुरू होण्याआधी उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीने मतदान केंद्रातच EVM ची हळद-कुंकवाने पूजा केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने केंद्रप्रमुखावर कारवाई केली.

Rahul Shelke

Pune EVM Aarti Controversy: राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची जोरदार हवा होती. आरोप–प्रत्यारोप, सभा–मेळावे यामध्ये प्रचाराने तापलेलं वातावरण शांत झालं आहे. राज्यातील 264 नगराध्यक्ष आणि 6,042 सदस्य पदांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झालं आहे.

याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील भोर नगरपरिषद मतदान केंद्रात एक विचित्र घटना घडली. NCP (अजित पवार गट) चे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीने मतदान सुरू होण्याआधी EVM मशीनची हळद–कुंकवाने पूजाअर्चा केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई सुरू केली आहे.

केंद्र प्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल, नवीन प्रमुखाची नेमणूक

EVMची आरती केल्यामुळे थेट केंद्र प्रमुखालाच जबाबदार धरत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित मतदान केंद्रावर नवीन केंद्र प्रमुखाची नियुक्तीही करण्यात आली आहे. याशिवाय उमेदवार केदार देशपांडेंवरही आयोगाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतदानासाठी पोलीस बंदोबस्त

मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मॉक पोलची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शांतता राखण्यासाठी पोलिसांचा पुरेसा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात 4.51 लाख मतदार, 524 मतदान केंद्रे

पुणे जिल्ह्यातील 524 मतदान केंद्रांवर 4 लाख 51 हजार 25 मतदारांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या निवडणुकीत

  • 1,031 उमेदवार रिंगणात असून

  • 76 नगराध्यक्ष आणि 955 सदस्य पदांसाठी लढत होत आहे.

मतदारांसाठी विशेष सुविधा

मतदान केंद्रांवर पाणी, स्वच्छतागृहे, महिला मतदारांसाठी स्वतंत्र बूथ, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, मार्गदर्शक, पुरेशी सावली यांसह CCTV आणि सुरक्षित मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. भोरमधील EVM पूजेमुळे निर्माण झालेल्या वादंगानंतर जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग आता आणखी कडक पावले उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT