पुणे

Pune News : मतदार यादीत नावनोंदणी, दुरुस्तीसाठी 9 पर्यंत संधी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविणे आणि दुरुस्ती 9 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे नावनोंदणी, दुरुस्ती करता येणार असली, तरी प्रत्यक्षात कागदपत्रांची पूर्तता करणे किंवा प्रत्यक्ष अर्ज नोंदणी केल्यानंतर तो संबंधित निवडणूक अधिकार्‍यांपर्यंत देण्यासाठी मतदारसंघनिहाय शहरातील 11 विविध ठिकाणी, तर ग्रामीण भागातील 12 तालुक्यांच्या तहसील कार्यालयांमध्ये निवडणूक कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.

येथे करा प्रत्यक्ष नोंदणी

जुन्नर तहसील कार्यालय, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मुळशी, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील नागरिकांना तहसील कार्यालयांमध्ये नोंदणी करता येईल.

शहरी विधानसभा मतदारसंघातील नोंदणी केंद्र

  • चिंचवड : यशवंतराव चव्हाण माध्यमिक शाळा, जी. क्षेत्रीय कार्यालय थेरगाव.
  • पिंपरी : डॉ. हेडगेवार भवन सेक्टर नं.26 आकुर्डी.
  • भोसरी : राजीव गांधी माध्यमिक महाविद्यालय, नवीन इमारत दुसरा मजला, नेहरुनगर
  • वडगाव शेरी : येरवडा- कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय, येरवडा.
  • शिवाजीनगर : अन्नधान्य वितरण कार्यालय, सेट्रल बिल्डिंग,पुणे.
  • कोथरूड : रेल्वे आरक्षण केंद्र, क्षेत्रीय कार्यालय कर्वेनगर, पुणे.
  • खडकवासला : हवेली तहसील कार्यालय, खडकमाळ, शुक्रवार पेठ.
  • पर्वती : बाबूराव सणस मैदान, सारसबाग, पुणे.
  • हडपसर : जिल्हा पुनर्वसन कार्यालय, बी विंग- जिल्हाधिकारी कार्यालय.
  • पुणे कॅन्टोन्मेंट : भूसंपादन कार्यालय बी विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
  • कसबा पेठ : पुणे शहर तहसील कार्यालय, मामलेदार कचेरी.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT