Engineering Admission Pudhari
पुणे

Maharashtra Engineering Admission 2026: राज्यात २.१६ लाख जागा उपलब्ध; संगणक अभियांत्रिकीला सर्वाधिक मागणी

सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया सुरू; २.४४ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, २ ऑगस्टला पहिली जागावाटप यादी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी राज्यात ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १११ अभ्यासक्रम उपलब्ध असून, २ लाख १६ हजार ५५२ जागा उपलब्ध आहेत. यावर्षी सर्वात जास्त जागा संगणक अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाच्या असून, ३० हजार ९९३ जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमा-साठीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी २ जुलै २०२६ पासून सुरू झाली होती. दिनांक १९ जुलै २०२६ रोजी ही ऑनलाईन नोंदणी संपली, तर ३० जुलैपर्यंत प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम ऑनलाईन भरता येणार आहेत. यावर्षी २ लाख ४४ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

येत्या २ ऑगस्टला पहिल्या फेरीच्या जागावाटपाची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ३ ते ५ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्याला मिळालेली जागा स्वीकारून नेमून दिलेल्या संस्थेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

राज्यात पहिल्या फेरीसाठी एकूण २ लाख १६ हजार ५५२ जागा उपलब्ध असून, यामध्ये १ लाख ९२ हजार ०३० जागा सर्व प्रवर्गासाठी, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी १५ हजार ७३४ व ८ हजार ७८८ जागा टीएफडब्ल्यूएसमधील आहेत. यावर्षी २ लाख ४४ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT