Pink Rickshaw  Pudhari
पुणे

Pink Rickshaw: राज्यातील आदिवासी महिलांना मिळणार 'पिंक रिक्षा', अट फक्त एकच

महिलांना ई-रिक्षा योजनेमधून पिंक (गुलाबी) रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

Tribal Women Maharashtra Government Scheme Pink Rickshaw

शिवाजी शिंदे

पुणे : शहर आणि गाव खेड्यापासून अत्यंत दुर्गम भागात राहणा-या आदिवासी महिला सक्षम होणार असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार या महिलांना स्वंयम रोजगारासाठी शेळी, मेंढी, कुक्कुट पालनाबरोबरच दुग्ध, मासेमारी व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ज्या महिला शहराच्या जवळ राहत असतील त्यांना ई-रिक्षा योजनेमधून पिंक (गुलाबी) रिक्षा रोजगार करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आदिवासी, आदिम जमाती अजुनही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूरवर आहेत. त्यांना रोजचे जगणे आणि पोटाचे खळगी भरण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागत आहे. त्यातही महिलांनाचे जगणे तर खूपच खष्ट आणि प्रतिष्ठा मात्र, अजिबातच नाही. अशा अवस्थेत जगत असलेल्या आदिवासी तसेच आदिम जमातीमधील महिलांसाठी राज्य शासनाने राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजान राबविण्यात येणार आहे. या योजनेनुसार आदिवाशी महिलांना शिक्षण, आरोग्यसेवा, आर्थिक सक्षमता, योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांच्या देखील सर्वागीण सक्षम बनण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. त्यांचे जीनवमान बदलून त्या आर्थिक सक्षम होऊन मुख्य प्रवाहात येऊ शकतात.

त्यासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतर्गत वैयक्तिक आणि सामुहिक योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे. त्यातही बचत गट असतील तर लाभाच्या संधी जास्त असणार आहेत. या आदिवाशी महिलांचे आर्थिक उत्पन्न अगोदरच कमी असते. त्यातही एखाद्या शासकीय योजनेच्या माध्यमातून कर्ज घ्यावयाचे असेल तर नियमानुसार असलेली भरावी लागणारी रक्कम देखील त्यांच्याकडे नसते. ही बाब लक्षात घेऊनच केंद्रवर्ती मध्यवर्ती योजना आणि राणी़ दुर्गावती आदिवसी महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून स्वंयम रोजगारासाठी संपूर्ण आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आदिवासी महिलांना रोजगारासाठी ई-रिक्षा योजनेमधून ‘ प़िंक’ (गुलाबी ) रिक्षा देण्यात येणार आहे. तसेच शेळी मेंढी, कुक्कुट पालन, करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे.सामुहिक कामासाठी त्यातही बचत गट असतील तर त्यांना आणखी जास्त लाभ मिळण्यावर भर राहिल. दुग्ध व्यवसाय,मासेमारी करण्यासाठी जाळी, शेततळ्यासाठी प्लस्टिक, नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरूस्त, इनवेल बोअरिंग,वीज जोडणी, तुषार सिंचन, ठिबक सिंचन,बिगर यांत्रिक नौका खरेदी,यासह विविध योजनांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी या योजनांचा उपयोग होणार आहे. या सर्व योजानांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.

आदिवासी महिलांना वैयक्तिक व्यवसाय / उत्पन्न वाढविण्यासाठी या आहेत योजना

रिक्षा, शिलाई मशीन, चहा स्टॉल,फुलहार आणि गुच्छ विक्री स्टॉल, ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी साहित्य, भाजीपाला स्टॉल,खेळणी साहित्य, पत्रावळी बनविण्यासाठी यंत्र

सामूहिक योजना

आटाचक्की, मंडप साहित. शुध्द पेयजल विक्री केंद्र उभारणी, बेकरी उत्पादन तयार करणे, नाष्टा केंद्र, दुग्ध संकलन केंद्र, दुग्धजन्य पदार्थांची उत्पादन व विक्री,झेरॉक्स व टायपिंग केंद्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT