पुणे

Navratri 2023 : आई एकवीरादेवी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

अमृता चौगुले

कार्ला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला वेहेरगाव येथील कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या मंदिरात रविवारी (दि. 15) घटस्थापना होणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
महाराष्ट्रातील तमाम आगरी, कोळी, कुणबी समाजाची कुलदैवत असणार्‍या कार्ला एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक मोठ्या संख्येने येत असतात. रविवारी सकाळी सात वाजता एकवीरा देवस्थान प्रशासकीय समिती, गुरव, पुजारी प्रतिनिधी यांंच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.

गर्दी कमी करण्यासाठी रांगा वाढवण्यात येणार

दोन दिवसांपूर्वी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांंच्या मार्गदर्शनाखाली वडगाव तहसील कार्यालयात एकवीरा देवस्थान विश्वस्त, व्यवस्थापक, पुजारी गुरव प्रतिनिधी व पोलिस प्रशासन तसेच सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या नवरात्र उत्सवाच्या काळात भाविकांना सहजतेने आणि सुलभपणे देवीचे दर्शन घेण्यासाठी विशेष उपाय योजना करण्यात आली असून, पायर्‍यांवरील गर्दी कमी करण्यासाठी दर्शनाच्या रांगा वाढवण्यात येणार आहेत.

गडावर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा

गडावर भाविकांना पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात तसेच विनाअडथळा गडावर जाता यावे, याकरिता संबंधित विभागाने नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदार देशमुख यांनी सर्व विभाग अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांनी सांगितले. तसेच, पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंंचायत समिती निवडणुका होणार असल्याने इच्छुक उमेदवार मतदारांना देवीच्या दर्शनासाठी घेऊन येत असल्याने गर्दी होऊ शकते. त्यामुळे पोलिस प्रशासनावर ताण वाढू शकतो. तसेच, या प्रशासकीय मंडळाद्वारे नवरात्रोत्सवाच्या यात्रा काळात होणार्‍या विविध खर्चासाठी इच्छुक देणगीदार भाविकांनादेखील प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT