पुणे

शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग : चंद्रकांत पाटील

Laxman Dhenge

बाणेर : पुढारी वृत्तसेवा : 'शिक्षणामुळे समाजात मोठे परिवर्तन होत आहे. यामुळे शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे,' असे प्रतिपादन उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कै. मारुती महादू सुतार विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व नामकरण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, डॉ. पंकज गावडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, जयदेव गायकवाड, शांताराम इंगवले, माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे, तानाजी निम्हण, ह.भ.प. राजाभाऊ चोपदार, सुनील रासने, शेठजी निम्हण, शांताराम महाराज निम्हण आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, 'सुतारवाडी येथे आबासाहेब सुतार यांनी वडिलांच्या स्मरणार्थ शाळेची इमारत उभी केली असून, ही कौतुकाची गोष्ट आहे.' माजी स्वीकृत सदस्य शिवम सुतार म्हणाले, 'परिसरातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.'

हेही वाचा

SCROLL FOR NEXT