पुणेः डंपरचालकाने जोरात हॉर्न वाजविला. त्यामुळे समोरील दुचाकीस्वार दुचाकी स्लीप झाल्याने खाली पडला. पाठीमागील डंपर अंगावरून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. सचिन वसंत धुमाळ (वय. 28,रा. मल्हारनगर वडगाव शेरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Latest Pune News)
याप्रकरणी, सचिन याचा मित्र स्वप्निल भानुदास माने (वय. 25,रा. सोमनाथनगर, मूळ. परभणी) याने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डंपरचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रात्री बारा वाजताच्या सुमारास टाटा गार्ड रूम बस स्टॉप जवळ विमाननगर परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने आणि मृत सचिन हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. या वेळी सचिन दुचाकी चालवित होता. पाठीमागून आलेल्या डंपरचालकाने जोरात हॉर्न वाजविला. त्यामुळे दुचाकी स्लीप झाल्याने दोघे खाली पडले. त्यावेळी डंपर अंगावरून गेल्याने सचिन याचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळी न थांबता फरार झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे यांनी दिली.