ओतूर: अहिल्यानगर-कल्याण महामार्गांवरील डुंबरवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल अभिजितसमोर ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणारी मजुरांनी खचाखच भरलेल्या पीकअपला आळेफाटा दिशेकडून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या दुधाच्या टँकरने जोरदार धडक दिली.
यामध्ये पिकअप टेम्पोतील दोघे जागीच ठार तर २५ मजूर जखमी झाल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. यापैकी ६ ते ७ जण गंभीर जखमी असून जखमींना उपचाराकामी आळेफाटा आणि ओतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा भीषण अपघात मंगळवारी (दि. ३०) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून अपघातग्रस्तांना ओतूर पोलिस व स्थानिक ग्रामस्थ मदत करीत आहे. अपघातातील मृत व जखमींची नावे मिळू शकली नाहीत.