DRDO Pudhari
पुणे

DRDO Military Explosives Seminar: डीआरडीओमध्ये लष्करी स्फोटके व सुरक्षेवर राष्ट्रीय मंथन; तंत्रज्ञान, सुरक्षा आणि अनुपालनावर भर

पुण्यात संरक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात शास्त्रज्ञ, उद्योगतज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांची उपस्थिती; स्फोटक निर्मितीपासून वापरापर्यंतच्या सुरक्षेवर सविस्तर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या संरक्षण उत्पादन विभाग आणि 'गुणवत्ता हमी महासंचालनालय नवी दिल्ली यांच्या अखत्यारीतील 'गुणवत्ता हमी नियंत्रक कार्यालय ( लष्करी स्फोटके ) पुणे यांच्या वतीने 'लष्करी स्फोटके आणि प्रणोदके: सुरक्षा आणि अनुपालन' या विषयावर एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या चर्चासत्रास संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुणवत्ता हमी महासंचालनालयाचे महासंचालक एन. मनोहरन यांनी आपले विचार मांडले.यावेळी झालेल्या चर्चासत्रात धोरणकर्ते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, संरक्षण उत्पादन क्षेत्रातील प्रमुख नेते, शास्त्रज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले होते.

सह-सचिव (लँड सिस्टिम्स) डॉ. गरिमा भगत, सह-सचिव प्रकाश राजपुरोहित, 'म्युनिशन्स इंडिया लिमिटेड'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, स्फोटक उद्योगांचे प्रतिनिधी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे शास्त्रज्ञ तसेच आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञांचा समावेश होता.

या मुद्यांवर झाली चर्चा...

  • प्रक्रियेतील सुरक्षा वाढवणे, स्फोटके निर्मिती केंद्रांमधील अपघात कमी करणे

  • स्वयंचलित प्रणालींना (ऑटोमेशन) चालना देणे, प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाचा अवलंब करणे

  • सरकारी संस्था, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम, खाजगी उद्योग, संशोधन संस्था व शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे

  • लष्करी स्फोटके आणि प्रणोदके यांच्या संपूर्ण डिझाइन आणि विकास ते उत्पादन

  • चाचणी,वाहतूक, साठवणूक, हाताळणी आणि प्रत्यक्ष वापर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT