पुणे: हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल), डीआरडीओ, पुणेच्या वतीने दि. 8 जानेवारी रोजी आगामी काळातील स्फोटके (नेक्स्ट जनरेशन हाय एक्सप्लोझिव्ह मॉडेलिंग) या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आणि लघु अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यात स्फोटके आणि सैन्यदलातील प्रगत सामग््राी, उच्च-ऊर्जासामग््राीचे संगणकीय मॉडेलिंग, डिझाइनमधील नव्या संशोधनावर विचारमंथन करण्यासाठी शैक्षणिक-औद्योगिक संवाद आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिक्षण, उद्योग, डीआरडीओ, इस्रो, आयआयटी इत्यादी संशोधन संस्थांमधील सुमारे 150 प्रतिनिधींनी भाग घेतला.
स्फोटकांवरही चर्चा
एचईएमआरएलचे संचालक डॉ. ए. पी. दाश यांनी पुढील पिढीच्या स्फोटक फॉर्म्युलेशनची कार्यक्षमता आणि सुरक्षा वैशिष्ट्ये दोन्ही वाढवण्यासाठी भविष्यसूचक मॉडेलिंग फेमवर्कच्या गरजेचे महत्त्व सांगितले. एचईएमआरएलचे तंत्रज्ञान संचालक डॉ. एम. बी. तळवार यांनी या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये आणि ध्येय यांची माहिती दिली.
दीडशे प्रतिनिधींची उपस्थिती
या अभ्यासक्रमात नामांकित शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग व्यावसायिकांनी दिलेली आठ तज्ज्ञ व्याख्याने होती, ज्यात आण्विक मॉडेलिंग, एआय-सहाय्यित रेट्रोसिंथेसिस, अत्यंत उष्ण-यांत्रिक उत्तेजनांखालील सामग््राीचे वर्तन आणि ऊर्जावान प्रणालींचे मूल्यांकन या विषयांचा समावेश होता. या कार्यक्रमाचा समारोप पॅनेल चर्चेने झाला.
हायटेक युद्ध सामग््राी कशी वापरावी यावर केले मार्गदर्शन
उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून आर्मामेंट अँड कॉम्बॅट इंजिनीअरिंग (एसीई) चे महासंचालक प्रा. डॉ. प्रतीक किशोर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी उपस्थित होते. प्रा. किशोर यांनी भविष्यातील ऊर्जावान सामग््राीच्या अचूक-केंद्रित विकासासाठी उच्च-कार्यक्षमता संगणन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सिम्युलेशन-आधारित कार्यपद्धतींच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकला.