Pune Municipal Election Counting: मतमोजणीसाठी महापालिकेची जय्यत तयारी; ३० हजार कर्मचारी तैनात

शहरात १५ ठिकाणी मतमोजणी; सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिका प्रशासनाने मतमोजणीसाठीची जय्यत तयारी केली असून तब्बल 30 हजार कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहेत. शहरात 15 ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होऊन दुपारी तीनपर्यंत सर्व ठिकाणच्या निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणीच्या एका फेरीसाठी साधारणतः 35 ते 45 मिनिटांचा कालावधी लागणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

Pune Municipal Corporation
Daund Gas Cylinder Blast: हॉटेल जगदंबा गॅस स्फोट प्रकरणाने खळबळ; जखमींच्या उपचारांवर प्रश्नचिन्ह

महापालिकेच्या 41 प्रभागात नगरसेवकांच्या 165 जागा आहेत. त्यासाठी 1 हजार 555 उमेदवार रिंगणात असून 15 जानेवारीला (गुरूवारी) मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 41 प्रभागांमध्ये 4 सदस्यीय 40 प्रभाग आहेत. तर प्रभाग क्रमांक 38 हा पाच सदस्यीय आहे.

Pune Municipal Corporation
Avsari Khurd Water Supply Problem: अवसरी खुर्दमध्ये पाणीपुरवठ्याचा सावळा गोंधळ; महिलांचा संताप

मतमोजणीसाठी 15 मतमोजणी केंद्रावर 335 मतमोजणी टेबल असणार आहे. यातील 38 टेबल टपाली मतदाना करता तर मतदान यंत्र मोजण्यासाठी 297 टेबल असणार आहेत. एका प्रभागासाठी मतमोजणीच्या किमान 4 तर जास्तीत जास्त 12 फेऱ्या होतील. एका फेरीसाठी साधारण 35 ते 45 मिनीटे लागतील. त्यामुळे महापालिकेचा निकाल दुपारी तीनपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Pune Municipal Corporation
Baramati ZP PS Election Delay: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एप्रिलमध्येच?

मतमोजणी केंद्रे व संबंधित प्रभाग क्र. - मतमोजणी केंद्र - प्रभाग क्रमांक

1) कै. राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी - 1, 2, 6

2) नगररोड - वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय, नवीन इमारत, पुणे - 3, 4, 5

3) कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर - 7, 12

4) शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगेड्ढबालेवाडी - 8, 9

5) एमआयटीड्ढडब्ल्यूपीयू वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, द्रोणाचार्य बिल्डिंग, पहिला मजला, कोथरूड - 10, 11, 31

6) भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क - 13, 14

7) साधना विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कर्मवीर सभागृह, हडपसर - 15, 16, 17

Pune Municipal Corporation
IT Youth Art Education Trend: आयटीतील तरुणाई कलाशिक्षणाकडे; नृत्याचा सर्वाधिक ट्रेंड

8) जिजाऊ मंगल कार्यालय, एसआरपीएफ कॅम्प, युनिट क्रमांक 1, वानवडी -18, 19, 41

9) कै. बाबुराव सणस क्रीडांगण, बॅडमिंटन हॉलजवळील कबड्डी मैदान, सारसबागे शेजारी, स्वारगेट - 20, 21, 26

10) रफी अहमद किदवाई उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळमजला हॉल, 531, भवानी पेठ - 22, 23, 24

11) डी.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड - 25, 27, 28

12) पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग््राजी माध्यम शाळा, पौड फाटा- 29, 30, 32

13) श्री शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, वडगाव बु.- 33, 34, 35

14) धनकवडी ड्ढ सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय, प्रांगणातील बंदिस्त शेड, राजीव गांधी प्राणी संग््राहालय समोर, पीएमपीएमएल डेपोजवळ, कात्रज - 36, 37, 38

15) छत्रपती संभाजी महाराज ई-लर्निंग स्कूल, गोकुळनगर, हुमेरी पार्कजवळ, हॉटेल न्यू एकादशी जवळ, कात्रजड्ढकोंढवा रोड - 39.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news