DJ Pudhari
पुणे

DJ Dolby Laser Health Risks: डीजे, डॉल्बी आणि लेझर शो एकच नाहीत; मर्यादा ओलांडल्यास आरोग्याला धोका!

ध्वनी आणि प्रकाशाच्या तीव्रतेवर नियंत्रण गरजेचे; डीजेमधून ९० ते ११० डेसिबल आवाज, लेझर किरण डोळ्यांसाठी ठरू शकतात धोकादायक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सव, नवरात्र, मिरवणुका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजे, डॉल्बी साउंड आणि लेझर शोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, यामध्ये मोठे साम्य असून, तिन्ही एकच नसून त्यांची कार्यपद्धती, तीव्रता हे सर्व वेगवेगळे आहे.

मर्यादा ओलांडल्यास वातावरणानुसार आणि आकारमानानुसार याचा मानवी आरोग्यावर भौतिक वातावरणावर परिणाम होते, असे काही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. डॉल्बीचा संबंध मुख्यतः ध्वनीशी, तर लेझरचा संबंध प्रकाशाशी आहे. त्यामुळे त्यांचा वापर करताना आवाज आणि प्रकाशाच्या मर्यादांची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांकडून नमूद करण्यात आले.

डॉल्बी म्हणजे काय?

डॉल्बी ही ध्वनी तंत्रज्ञानाची प्रणाली आहे. आवाज अधिक स्पष्ट, संतुलित आणि सभोवतालून येत असल्याचा अनुभव देण्यासाठी विविध डॉल्बी उपकरणाचा वापर केला जातो.

मोजमाप कसे?

  • डॉल्बीसाठी मापक मर्यादा नाही.

  • दणदणाट आणि तीव्रता याच्या आवाजावर डेसीबलमध्ये मोजणी होते.

  • ५० ते ६० डेसिबलपर्यंत आवाज उत्तम आहे.

  • ७० - ८० डेसिबलपर्यंत आवाज आरोग्यासाठी घातक

डीजे म्हणजे काय?

एखादे संगीत विविध ध्वनिपातळीवर एकत्रित करून ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून ते मोठ्या आवाजात सादर करता येते. यामध्ये डीजेमध्ये मोठे स्पीकर, सबवूफर आणि ॲम्प्लिफायर वापरले जातात.

मोजमाप कसे?

  • डीजेत आवाजाची तीव्रता डेसीबलमध्ये मोजतात

  • डीजे साउंडच्या माध्यमातून ९० ते ११० डेसिबलपर्यंत आवाज निर्माण होतो.

  • आरोग्यानुसार किमान ४५ ते ५५ डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा आहे.

  • मर्यादा ओलांडल्यास श्रवणशक्ती परिणाम, डोकेदुखी

लेझर म्हणजे काय?

डीजे, डॉल्बी गाण्यातील ताल, सूर, लयावर दूरपर्यंत विद्युत पट्टी चमकणारी यंत्रणा म्हणजे लेझर. याचे किरण अत्यंत तीव्र आणि दिशात्मक असतात. रंगीत प्रकाशकिरण, आकाशात फिरणारे बीम आणि विविध दृश्य परिणामांसाठी त्याचा वापर केला जातो. मिलीवॅट आणि वॅटमध्ये मोजली जाते. लेझरचे किरण थेट डोळ्यांवर पडणे धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञ मंडळी सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT