Pune Ganeshotsav Sound System Ban: गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाजाला लगाम; प्लाझ्मा, प्रेशर मीडवर बंदी कायम

ध्वनिमर्यादा ओलांडल्यास थेट जप्तीची कारवाई; गणेशोत्सव-दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा स्पष्ट इशारा
Ganeshotsav Sound System Ban
Ganeshotsav Sound System BanPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिव्यवस्थेबाबत पोलिस प्रशासनाने 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली असली, तरी कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या प्लाझ्मा आणि प्रेशर मीड या ध्वनियंत्रणांवरील बंदी कायम राहणार आहे. निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन अथवा नियमबाह्य ध्वनियंत्रणेचा वापर आढळल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

Ganeshotsav Sound System Ban
Pune Ganeshotsav: हा उत्सव कुणाचा..?

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याची मागणी गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मात्र, कर्णकर्कश ध्वनीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला मोकळीक दिली जाणार नाही, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली आहे. तीव्र आवाज करणाऱ्या ध्वनियंत्रणेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

Ganeshotsav Sound System Ban
Gultekdi Market Yard Security: गुलटेकडी मार्केट यार्डाची सुरक्षा वाऱ्यावर! सुटीच्या दिवशी बाजार आवार बनले क्रीडांगण, नशेखोरांचा अड्डा

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सोमवारी महापालिकेत विविध विभागांचे अधिकारी, पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी उत्सवावरील निर्बंध शिथिल करून निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरा करण्याची मागणी केली. शहरातील हॉटेल आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहतात; मग त्यांच्यासाठी वेगळे आणि शतकोत्तरी परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी वेगळे नियम का, असा सवालही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

Ganeshotsav Sound System Ban
PMPML Bus Accident Compensation: पीएमपी बस अपघातग्रस्तांना मोठा दिलासा! मदतीची रक्कम दुप्पट; मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ३ लाख

दरम्यान, प्लाझ्मा आणि प्रेशर मीडसारख्या अतितीव्र आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांवर पूर्णपणे बंदी राहणार असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. याबाबत संबंधित सर्व घटकांमध्ये सहमती असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्तालयात प्रेशर मीड आणि सामान्य साउंडमधील फरकाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. चार टॉप आणि दोन बेससह दोन प्रेशर मीडचा आवाज समान पातळीवर ठेवून हे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी प्रेशर मीडचा आवाज असह्य पातळीपर्यंत जात असल्याचे स्पष्ट झाले. सामान्य साउंडच्या तुलनेत प्रेशर मीडचा आवाज अधिक तीव्र आणि त्रासदायक असल्याचे या प्रात्यक्षिकातून दिसून आले.

Ganeshotsav Sound System Ban
Pune PMPML E Bus Charging Stations: पीएमपीचा ग्रीन ट्रान्सपोर्ट प्लॅन; पुणे-पिंपरीत ५ नवीन ई-बस चार्जिंग स्टेशन्स

आवाजाची मर्यादा निश्चित होणार

ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत निश्चित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. ध्वनीची निर्धारित मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी आवाजाची पातळी निश्चित केली जाणार आहे. तसेच डीजेमध्ये किती 'बेस' आणि किती 'टॉप' वापरता येतील, याबाबतही नियमांच्या चौकटीत चर्चा केली जाणार आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून, लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news