Divya Shinde Pudhari
पुणे

Divya Shinde: ‘बिग बॉस’फेम दिव्या शिंदे ‘अँक्झायटी Attack’चे कारण देऊन माहिती लपवतेय, पोलिसांचा दावा

Pune crime : तपासात तब्बल १७ जणांचा सहभाग निष्पन्न, आरोपी आठ दुचाकींवरून घटनास्थळी आल्याचे समोर

पुढारी वृत्तसेवा

Divya Shinde Pune Case

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्यावरील जीवघेणा हल्ला आणि पाच लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी ‘बिग बॉस’फेम दिव्या सुनील शिंदे हिच्या पोलिस कोठडीत 2 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमित कुलकर्णी यांनी दिला आहे.

तपासात तब्बल १७ जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून, हे आरोपी आठ दुचाकींवरून घटनास्थळी आल्याचे समोर आले आहे. बुधवारी (दि. ३०) दिव्या शिंदे हिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. हल्ल्यात वापरलेली हत्यारे, मोबाइल फोन आणि इतर डिजिटल पुरावे अद्याप जप्त करायचे असल्याने पोलिसांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली.

तपासादरम्यान पोलिसांनी ‘ब्लू नाईल’ हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये आप्पा ढमढेरे, डॉ. गायकवाड आणि त्यांच्या मुलामध्ये पाच लाख रुपयांच्या खंडणीबाबत बैठक झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. या गुन्ह्यात आप्पा ढमढेरे (रा. पिंपरी), निखिल शिंदे, निखिलची होणारी पत्नी, ताहीर (रा. कोंढवा) यांच्यासह अन्य १३ अनोळखी व्यक्तींचा सहभाग निष्पन्न झाल्याचे सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

हत्यारे, मोबाइल जप्त करणे बाकी

हल्ल्यात वापरलेले लोखंडी हत्यार, लाकडी दांडके, स्वाक्षऱ्यांचे नमुने, हस्तलिखित मजकूर आणि हल्ल्याचे चित्रीकरण करणारा मोबाइल फोन अद्याप जप्त झालेला नाही. या वस्तू हस्तगत करण्यासह संपूर्ण गुन्हेगारी कटाचा उलगडा करण्यासाठी दिव्या शिंदेची कोठडी वाढवून मिळणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील कस्तुरे यांनी केला.

हल्ला करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण?

रिमांड रिपोर्टनुसार, चौकशीदरम्यान दिव्या शिंदे तपासात सहकार्य करीत नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. माहिती देण्यास टाळाटाळ करणे, अंगविक्षेप व आरडाओरड करणे तसेच ‘अँक्झायटी अटॅक’ (‘तीव्र चिंतावस्था’) आल्याचे सांगून माहिती लपविल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्‍या अहवालात नमूद केले आहे. हल्‍ला करताना मोबाईल मध्ये चित्रीकरण केल्‍याचेही तपासात समोर आले असून हा मोबाईल जप्‍त करण्यासाठीही पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT