PMC Election Analysis Pudhari
पुणे

Pune Municipal Election Analysis: धानोरी-कळस-लोहगाव प्रभाग १ : इतिहासाची पुनरावृत्ती, टिंगरे कुटुंबाचा दबदबा कायम

भाजपला तीन, राष्ट्रवादीला एक जागा; अनिल टिंगरे यांची हॅट्ट्रिक, रेखा टिंगरे यांचा विजयाचा चौकार

पुढारी वृत्तसेवा

संतोष निंबाळकर

धानोरी: कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित प्रभागामध्ये (क्र.1) पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. पॅनल प्रमुख अनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2017 प्रमाणेच तीन, तर राष्ट्रवादी काँग््रेासने एक जागा जिंकली. रेखा टिंगरे यांनी विजयाचा चौकार मारला, तर अनिल टिंगरे यांनी हॅट्‌‍ट्रिक साधली.

मतदार संख्या सुमारे 19 हजारांनी वाढूनही 2017 च्या तुलनेत रेखा टिंगरे यांचे मताधिक्य 1044 ने, तर अनिल टिंगरे यांचे मताधिक्य 6,927 ने कमी झाले आहे. राष्ट्रवादी काँग््रेासच्या रेखा टिंगरे यांना रोखण्यासाठी प्रभाग 1 मध्ये मोठी तयारी केलेल्या पूजा जाधव-मोरे यांच्या उमेदवारीच्या घोळामुळे भाजपला प्रभाग 1 व 2 मध्ये नुकसान झाले. भाजपच्या वंदना खांदवे यांनी केवळ उच्च मध्यमवर्गीय भागावर लक्ष केंद्रित केल्याची किंमत त्यांना मोजावी लागली. रेखा टिंगरे यांनी अनेकदा पक्ष बदलूनही निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये (अजित पवार गट) घरवापसी केली. राष्ट्रवादी काँग््रेासच्या मीनाक्षी म्हस्के यांनी ऐनवेळी धनुष्यबाण हाती घेतला, तरीही दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्याचा आणि जनसंपर्काचा फायदा घेत टिंगरे यांनी विजयश्री खेचून आणली.

राष्ट्रवादी काँग््रेासचे शशिकांत टिंगरे यांनी एक रुपयामध्ये दवाखाना, कचरा गोळा करण्यासाठी मोफत घंटागाडी, अशा उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवून हॅट्‌‍ट्रिकच्या तयारीत असलेल्या अनिल टिंगरे यांना विजयासाठी झगडायला लावले. लोहगाव भागातून शिवसेनेचे (शिंदे गट) गिरीश जैवळ आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) सोमनाथ खांदवे या दोघांनी सुमारे 4500 मते घेतली. प्रभाग 3 मधील माजी नगरसेवक राहुल भंडारे यांची पत्नी अश्विनी भंडारे यांची ‌‘आयात उमेदवार‌’ अशी संभावना होऊनही त्यांनी विजश्री खेचून आणली. प्रभागरचना बदल्यामुळे राष्ट्रवादीच्या आरती चव्हाण यांचे विश्रांतवाडीतील हक्काचे मतदान कमी झाले होते.

त्यातच भाजपने उमेदवारी नाकारलेल्या लक्ष्मी माने-इंगुळकर यांनी मनसेकडून 4 हजार 479 मते घेतल्याचा फटका भंडारे यांच्याऐवजी आरती चव्हाण यांनाच बसला. माजी नगरसेवक मारुती सांगडे शर्यतीत नसल्याने भाजपकडे उमेदवारच नव्हता. मात्र, अनिल टिंगरे यांनी खेळी करीत राष्ट्रवादीचे संदीप दांगट यांच्या पत्नी संगीता दांगट यांना उमेदवारी मिळवून दिली. नूतन प्रताप यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने प्रचाराला वेळ कमी मिळाला. नूतन प्रताप यांना आव्हान उभे करता आले नाही.

प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादीला फायदा

राष्ट्रवादी काँग््रेासने सध्याच्या प्रभाग 2 मधील नूतन प्रताप आणि आरती चव्हाण यांना प्रभाग 1 मध्ये उमेदवारी दिली होती. मात्र दोघांनाही निवडणूक जिंकता आली नाही. मात्र त्यांच्या जनसंपर्काचा उपयोग प्रभाग 2 मधील राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवार निवडून येण्यासाठी झाल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT