Pune Municipal Election Analysis Pudhari
पुणे

Pune Municipal Election Analysis: धनकवडी–कात्रज डेअरी प्रभागात भाजपचा झेंडा; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

प्रभाग क्रमांक ३७ मध्ये चारही जागांवर भाजपचा विजय; रंगतदार लढतीत विरोधक पराभूत

पुढारी वृत्तसेवा

बाजीराव गायकवाड

धनकवडी-कात्रज डेअरी प्रभागात (क्र. 37) भाजपचे उमेदवार वर्षा तापकीर, बाळाभाऊ धनकवडे, अरुण राजवाडे आणि तेजश्री बदक हे विजयी झाले. या प्रभागात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग््रेास यांच्यात रंगतदार लढत झाली. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांची प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागली होती. भाजपच्या व्यूहरचनेमुळे पूर्वी राष्ट्रवादी काँग््रेासचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात या निवडणुकीत कमळ फुलले आहे.

या प्रभागात भारतीय जनता पक्षाने सर्वच जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व प्रथापित केले आहे. आमदार तापकीर यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या प्रभागात स्थानिक गावकऱ्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपने राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांना अखेरच्या क्षणी पक्षात प्रवेश देऊन प्रभावी मोट बांधली. त्यांच्या प्रभावाचा फायदा पक्षाला झाला. राष्ट्रवादी काँग््रेासच्या काही प्रमुख नेत्यांनाही पक्षात आणून भाजपने निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केले. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज सावंत हे देखील शिवसेनेकडून (शिंदे गट) उभे राहिल्याने या प्रभागाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात भाजपच्या उमेदवारांनी सर्व समीकरणे आपल्या बाजूला वळविल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले.

भाजपचे उमेदवार बाळाभाऊ धनकवडे यांना 26,941 मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार कैलास भोसले यांना 5,523, तर शिवसेनेचे उमेदवारचे सागर बारणे यांना 3,276 मते मिळाली. भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांनी 23,444 मते मिळवत विजय मिळविला. त्यांच्या अनुभवाचा पक्षाच्या इतर उमेदवारांनाही फायदा झाला. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग््रेासच्या वर्षा शिळीमकर यांना 6,241 तर शिवसेनेच्या सुलक्ष्मी धनकवडे यांना 3,053 मते मिळाली.

भाजपच्या तेजश्री बदक यांना 14,261 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग््रेासच्या श्रद्धा परांडे यांनी 12,056 मते घेत कडवी लढत दिली, तर शिवसेनेच्या मोहिनी देवकर यांना 5,812 मते मिळाली. याच प्रभागात भाजपचे अरुण राजवाडे यांनी 15,033 मते मिळवत विजय मिळविला. शिवसेनेचे गिरिराज सावंत यांना 10,661, तर राष्ट्रवादी काँग््रेासच्या विजय क्षीरसागर यांना 5,193 मते मिळाली.

या प्रभागात भाजपने वेगवेगळ्या भागांतून उमेदवार देऊन समतोल साधला. त्याचा फायदा त्यांना विजय मिळविण्यात झाला. गिरिराज सावंत यांच्यामुळे या प्रभागातील विजयाची समीकरणे बदलली जातील, असे बोलले जात होते. परंतु शिवसेनेचे संघटन मजबूत नसल्याने प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक विशाल तांबे आणि माजी नगरसेविका अश्विनी भागवत यांनी यंदा निवडणूक लढविली नाही. त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच झाला. या प्रभागातून भाजपच्या वर्षा तापकीर या चौथ्यांदा विजयी झाल्या. बाळाभाऊ धनकवडे दुसऱ्यांदा विजयी झाले. अरुण राजवाडे आणि तेजश्री बदक पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT