Bhor Village Issue Pudhari
पुणे

Bhor Village Issue: भोर तालुक्यातील धानवली गावात रस्ता नाही; आदिवासींची जीवघेणी पायपीट

रुग्णांना डोलीतून नेण्याची वेळ; मूलभूत सुविधांचा अभाव कायम

पुढारी वृत्तसेवा

अर्जुन खोपडे

भोर: भारत देश स्वतंत्र होऊन 78 वर्षे उलटली, तरी भोर तालुक्यातील रायरेश्वर पठाराच्या कड्याखालील आदिवासी पाड्यावरील धानवली गावची परिस्थिती आजही ‌‘जैसे थे‌’च आहे. येथे साध्या कच्च्‌‍या रस्त्याचाही पत्ता नसल्याने ग््राामस्थांना अडीच ते दहा किलोमीटरची जीवघेणी पायपीट करावी लागत आहे.

विशेषतः गंभीर रुग्ण किंवा गर्भवती महिलांना उपचारासाठी न्यायचे असल्यास ग््राामस्थांना आजही ‌‘डोली‌’ (झोळी) करून डोंगरदऱ्यातून मार्ग काढावा लागतो. कंकवाडी आणि तेथून वाहन न मिळाल्यास निगुडघर असे 10 किमीचे अंतर कापताना रुग्णांचे हाल होत आहेत.

वरच्या धानवलीत केवळ चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी लहान मुलांना दररोज 5 किलोमीटरची धोकादायक पायपीट करावी लागते. हा रस्ता दगडधोंड्यांचा आणि पावसाळ्यात अत्यंत निसरडा असल्याने मुलांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू आहे.

मूलभूत गरजांचा अभाव

  • पाणी : पिण्यासाठी अर्धा किलोमीटर लांब झऱ्यावर जाऊन हंडा डोक्यावर वाहून आणावा लागतो.

  • वीज : पावसाळ्यात वीज खंडित झाल्यास संपर्क यंत्रणा 8-8 दिवस ठप्प असते.

  • प्रशासन : पाण्याचा टँकर येण्यासाठीही रस्ता उपलब्ध नाही.

पाऊस काळात घराबाहेर पडणे मुश्कील असते. अशा वेळी रुग्ण आणि प्रसूतीसाठी स्त्रियांना डोलीतून नेणे, हे अतिशय कसरतीचे आणि जोखमीचे काम आहे.
दत्तात्रय धानवले, तालुकाध्यक्ष, आदिवासी महादेव कोळी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT