पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे 'विकसित भारत संकल्प यात्रा' वाहनाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.28) करण्यात आले. यात्रा बुधवारी (दि.29) संभाजीनगर व मोरवाडी भागात असणार आहे.
या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, उपायुक्त अजय चारठणकर, मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सुजाता पालांडे, राजू दुर्गे, क्षेत्रीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी महिला बचत गटाद्वारे लागलेल्या स्टॉलची पाहणी केली.
खा. बारणे म्हणाले की, केंद्र शासनाच्या विविध योजन आहे. त्यासाठी पात्र असलेल्या घटकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले की, केंद्र शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ही यात्रा काढण्यात येणार आहे. हे वाहन शहरात 64 ठिकाणी फिरणार आहे. त्याद्वारे योजनांच्या लाभार्थ्यांची ऑनबोर्डिंग करणे, पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, त्यांचा तपशील एकत्रित करणे, लाभार्थ्यांना योजनांशी जोडणी करणे यासह इतर योजनांसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहकार्य करणार आहेत.
यात्रा बुधवारी (दि.29) सकाळी दहाला शिवशंभो उद्यान, संभाजीनगर येथे जाणार आहे. दुपारी तीनला विरंगुळा केंद्र, मोरवाडी येथे असणार आहे. गुरूवारी (दि.30) सकाळी दहला आकुर्डी रूग्णालय येथे आणि दुपारी तीनला आकुर्डीतील महात्मा जोतीराव फुले प्राथमिक शाळेच्या परिसरात असणार आहे, अशी माहिती उपायुक्त लोणकर यांनी दिली.
हेही वाचा