Deccan Queen Pudhari
पुणे

Deccan Queen: ‘दख्खनची राणी’चा 97 वा वाढदिवस; पुणे-मुंबईच्या भावनिक नात्याचा ऐतिहासिक उत्सव

देशातील पहिली डिलक्स ट्रेन असलेल्या डेक्कन क्वीनच्या 97 वर्षांच्या प्रवासाचा पुणे स्थानकावर केक कापून आणि इंजिनला मानवंदना देत जल्लोषात साजरा होणार सोहळा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सोनेरी पान आणि पुणे-मुंबईचा भावनिक दुवा असलेली ‌‘दख्खनची राणी‌’ म्हणजेच डेक्कन क्वीन 1 जून 2026 रोजी आपल्या प्रवासाचा 97 वा टप्पा पार केला.

1 जून 1930 रोजी ‌‘ग््रेाट इंडियन पेनिनसुलर रेल्वे‌’ने सुरू केलेली ही देशातील पहिली डिलक्स ट्रेन सुरुवातीला ‌‘ब्लू बर्ड बेबी‌’ म्हणून ओळखली जात असे. इंग्लंडमध्ये बनवलेले डबे आणि कल्याण-पुणे मार्गावरून सुरू झालेला प्रवास पुढे ‌‘सीएसएमटी‌’पर्यंत विस्तारला; यात दादर, शिवाजीनगरसारखे थांबे जोडले गेले.

देशात पहिल्यांदा डायनिंग कार (32 आसनी आधुनिक हॉटेल सोय) आणि 15 ऑगस्ट 2021 पासून विस्टाडोम कोच जोडणारी ही मानाची ट्रेन आहे. आज सोमवारी (दि. 1 जून) सकाळी 6.45 वाजता पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर

रेल्वे प्रवासी ग््रुापच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्या नियोजनाखाली आणि कोहिनूर ग््रुापचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा झाला. सकाळी 7 वाजता फुलांनी सजवलेल्या इंजिनला मानवंदना देऊन 7.15 वाजता ही राणी मुंबईकडे रवाना झाली.

डेक्कन क्वीन ही आमच्यासाठी फक्त एक ट्रेन नाही, तर ती एक जिवंत भावना आहे. वयाच्या 5 व्या वर्षांपासून मी तिचा वाढदिवस साजरा करतेय, आज मी 72 वर्षांची आहे. वेळेचे पावित्र्य जपणारी ही राणी 100 व्या वर्षांत पदार्पण करेपर्यंत हा सोहळा असाच अविरत सुरू ठेवण्याची माझी इच्छा आहे. या गौरवशाली रेल्वेचा इतिहास इतका मोठा आहे की, तो पुढील पिढीपर्यंत पोहचण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. सर्व पुणेकरांनी उद्याच्या ऐतिहासिक सोहळ्यात नक्की सहभागी व्हावे!
हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग््रुाप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT