पुणे

Pune news : घोड नदीत पोहण्यासाठी गेलेल्याचा मृत्यू

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे मंगळवारी (दि. 26) सकाळी तुकाराम दत्तात्रय काळे (वय 56) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते घोड नदीवरील बंधार्‍याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. याबाबत त्यांचा मुलगा संदेश तुकाराम काळे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुकाराम काळे हे पोहण्यात तरबेज होते. ते नेहमी सकाळी चांडोली बुद्रुक येथील रेणुकामाता मंदिरानजीक असलेल्या घोड नदीत पोहण्यासाठी जात असत.

संबंधित बातम्या : 

त्याप्रमाणे ते मंगळवारी नात आर्या काळे (वय 12)समवेत पोहण्यासाठी गेले होते. एक तास होऊनही ते पाण्याबाहेर आले नाहीत. त्यामुळे नात आर्याने आरडाओरड केल्याने पंचक्रोशीतील नागरिक मदतीसाठी आले. तोपर्यंत तुकाराम काळे पाण्यात बुडाले होते. त्या वेळी बाबाजी दगडू काळे यांनी संदेश काळे यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. या वेळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
साहेबराव जाधव, सुरेश काळे, राजू काळे आदी तरुणांनी तुकाराम काळे यांना पाण्यातून बाहेर काढले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

SCROLL FOR NEXT