BJP Pudhari
पुणे

Daund Panchayat Samiti BJP Victory: दौंड पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; 1962 नंतर प्रथमच सभापती

सुखदेव चोरमले सभापती, अमृता गिरमकर उपसभापती; आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाला यश

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर: जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये दहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग््रेासने वर्चस्व प्रस्थापित केले असताना दौंड तालुक्यात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. दौंड पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवत जिल्ह्यातील एकमेव विजय नोंदवला आहे.

दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदी सुखदेव चोरमले यांची निवड झाली असून, उपसभापतिपदी अमृता गिरमकर यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1962 मध्ये पंचायत समिती स्थापनेनंतर प्रथमच दौंड पंचायत समितीत भाजपचा सभापती विराजमान झाला आहे, ही बाब राजकीयदृष्ट्‌‍या महत्त्वाची मानली जात आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग््रेासचे वर्चस्व असतानाही दौंडमध्ये भाजपने सत्ता मिळवणे हे स्थानिक राजकारणात आमदार राहुल कुल यांचे मोठे यश मानले जात आहे.

या विजयामागे आमदार राहुल कुल यांचे नेतृत्व, कार्यकर्त्यांची एकजूट आणि मतदारांचा विश्वास निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आ. कुल यांनी ग््राामपंचायत ते पंचायत समितीपर्यंत भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यावेळी फलदायी ठरल्याचे दिसून आले. आगामी काळात पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक भक्कम करून जनतेच्या अपेक्षांना अधिक न्याय देण्यासाठी आ. कुल यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दौंड तालुक्यात पंचायत समितीत भाजपची सत्ता येणे हा केवळ राजकीय विजय नसून जनतेने विकासाच्या विचाराला दिलेला ठाम कौल आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेतही पक्षाला चांगले यश मिळाले असून, आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि विकासकामांच्या जोरावर पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक भक्कम करून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा आमचा निर्धार आहे.
राहुल कुल, आमदार, दौंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT