दौंड: दौंड नगरपरिषद कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गब्बर वाल्मीकी (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण) याच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दौंड नगरपालिकेतील ३४ वर्षीय महिला अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २२) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दौंड नगरपरिषद कार्यालयात हा प्रकार घडला. आरोपी गब्बर वाल्मीकी हा फिर्यादीच्या सहकाऱ्यांच्या कॅबिनबाहेर उभा राहून अश्लील हावभाव करत शिवीगाळ करू लागला.
त्याच्या वर्तनामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा निर्माण झाली, तसेच वाल्मिकीने धमकीवजा भाषा वापरत, 'ती येथे कशी काम करते ते पाहून घेतो' असे म्हणत फिर्यादीकडे पाहून कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या दौंड नगरपालिकेत आंधळ दळतयआणि कुत्रा पीठ खाते अशी परिस्थिती झाली आहे ठेकेदार मुजोर झाले आहेत दोन्ही गट देखील आपापल्या परीने मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यात व्यस्त आहेत.
त्यामुळे दौंड नगरपालिकेची परिस्थिती आपण दोघे भाऊ भाऊ नगरपालिका वाटण खाऊ या म्हणीप्रमाणे झाली आहे जिल्हाधिकारी मात्र याबाबतीत काहीही बोलायला तयार नाहीत नगरपालिकेबद्दल अनेक तक्रारी आहेत परंतु वरिष्ठ अधिकारी याकडे जाणून-बुजून कानाडोळा करतात