पुणे

पुणे : अकरावीच्या तिसर्‍या फेरीत वाढले कटऑफ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयांतील पात्रता गुण (कटऑफ) तिसर्‍या फेरीत कमी होण्याऐवजी दुसर्‍या फेरीपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून आले आहे. तिसर्‍या फेरीतही नामांकित महाविद्यालयांमधील कटऑफ 85 ते 90 टक्क्यांच्या पुढेच आहेत. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांचे विशेष करून विज्ञान शाखेचे प्रवेश विद्यार्थ्यांना दुरापास्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील तिसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली.

काही प्रमुख महाविद्यालयांचे कट ऑफ (टक्के)

  • बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय : 93.8
  • फर्ग्युसन महाविद्यालय : कला शाखा 95.2, विज्ञान 95.4.
  • स. प. महाविद्यालय : विज्ञान 90, वाणिज्य 89, कला 83.8.
  • सिम्बायोसिस : कला 95, वाणिज्य 92.6.
  • शामराव कलमाडी कॉलेज : विज्ञान 93.2, वाणिज्य 88, कला 90.
  • मॉडर्न : विज्ञान 87, वाणिज्य 81.2, कला 70.
  • आबासाहेब गरवारे कॉलेज : विज्ञान 89.6, कला 74.8,
  • एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर : वाणिज्य 80.6, विज्ञान 86.6
  • नेस वाडीया कॉलेज ऑफ कॉमर्स : 69.

आपल्याला हवे तेच कॉलेज मिळावे यासाठी अनेक विद्यार्थी अडून राहिले होते. त्याचा परिणाम म्हणजे दुसर्‍या फेरीत कटऑफ कमी झाले. मात्र तिसर्‍या फेरीत विद्यार्थ्यांनी विविध कॉलेजांना प्राधान्य दिले. त्यामुळे कट ऑफ दुसर्‍या फेरीपेक्षा तिसर्‍या फेरीत दीड ते दोन टक्क्यांनी अधिक असल्याचे चित्र आहे.

– डॉ. राजेंद्र झुंजारराव,
प्राचार्य, मॉडर्न कॉलेज

हेही वाचा

SCROLL FOR NEXT