विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होईल!

जयंत पाटील
जयंत पाटील

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांच्यापेक्षा आमच्या पक्षाकडे अधिक आमदार असल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेता आमचाच असेल, असा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी अखेर उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे अधिक आमदार असल्याचे मान्य केले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होईल, असेही त्यांनी सांगून टाकले. याबाबत काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होणार आहे. सध्या सरकारमध्ये असणार्‍या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला विचारलेल्या प्रश्नांची आता त्यांनाच उत्तरे द्यावी लागणार आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. मंत्रिपदाची शपथ घेणार्‍यांचे आणि फडणवीस-शिंदे गटाच्या सरकारचे राज्य कारभाराकडे लक्ष नाही. खातेवाटपाचा लवकर निर्णय घेऊन कारभार सुरू केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राजासारखे वागणारे आता सुभेदार झाले : अजित पवारांना टोला

दरम्यान, दिल्ली दौर्‍यावर गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुभेदार असा उल्लेख डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news