CUET Pudhari
पुणे

CUET UG 2026 Registration: सीयूईटी यूजी 2026 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

एनटीएकडून अर्ज प्रक्रिया जाहीर; 30 जानेवारीपर्यंत नोंदणीची संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्टसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार आता एनटीएच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन सीयूईटी युजीसाठी नोंदणी करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करू शकतात. शुल्क भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 आहे. उमेदवारांना 2 फेबुवारी ते 4 फेबुवारी दरम्यान त्यांच्या फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची संधी देखील दिली जाईल.

सीयूईटी साठी अर्ज करण्यासाठी, सर्व श्रेणीतील उमेदवारांना नोंदणी शुल्क भरावे लागेल. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना तीन विषयांसाठी 1 हजार रुपये आणि अतिरिक्त विषयासाठी 400 रुपये, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना तीन विषयांसाठी 900 रुपये आणि अतिरिक्त विषयासाठी 375 रुपये नोंदणी शुल्क आहे. तर अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग उमेदवारांना तीन विषयांसाठी 800 रुपये आणि अतिरिक्त विषयासाठी 350 रुपये जमा करावे लागतील. एनटीएने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार परीक्षा 11 ते 31 मे 2026 दरम्यान घेतली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार देशभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतील.

...अशी करा ऑनलाइन नोंदणी

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी उमेदवाराने प्रथम अधिकृत वेबसाइट र्लीशीं.पींर.पळल.ळप ला भेट द्यावी. त्यानंतर वेबसाइटच्या होमपेजवरील नोंदणी लिंकवर क्लिक करावे. तिथे विचारण्यात आलेली आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी आणि मागितलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे गरजेचे आहे. सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर नोंदणी शुल्क भरा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT