CTET Pudhari
पुणे

CTET Exam 2026: सीटीईटी परीक्षा 7 व 8 फेब्रुवारीला; हॉलतिकीट उपलब्ध

सीबीएसईकडून 140 शहरांत परीक्षा; पेपर 1 सकाळी, पेपर 2 दुपारी, प्रवेशासाठी हॉलतिकीट अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईव्दारे आज दि. 7 आणि 8 फेबुवारीला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. संबंधित परीक्षेला बसणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी सीबीएसईने हॉलतिकीट उपलब्ध केले आहे.

या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत संकेतस्थळला भेट देऊन त्यांचे हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतात. परीक्षेला बसण्यासाठी हॉलतिकीट अनिवार्य आहे; त्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीटीईटी परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल. पेपर 1 प्राथमिक शिक्षक बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी असेल, तर पेपर 2 उच्च प्राथमिक शिक्षक बनण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी असेल. परीक्षेच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. पेपर 1 सकाळच्या सत्रामध्ये आणि पेपर 2 दुपारच्या सत्रामध्ये घेण्यात येईल.

प्रत्येक पेपरसाठी 2 तास 30 मिनिटे वेळ देण्यात आलेला आहे. सीटीईटी परीक्षा देशभरातील 140 शहरांमध्ये घेतली जाईल. उमेदवारांना त्यांच्या अर्जांच्या आधारे परीक्षा शहरे नियुक्त करण्यात आली आहेत. यापूर्वी, सीबीएसईने 23 जानेवारी 2026 रोजी शहर सूचना स्लिप जारी केली होती, ज्यामुळे उमेदवारांना त्यांची परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे.

याची आगाऊ माहिती मिळाली असेल. यामुळे उमेदवारांचे प्रवास आणि निवास नियोजन सुलभ होते. उमेदवारांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT