पुणे

Crime News : गुगलवरून हेल्पलाईन नंबर शोधणे पडले महागात

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गाना डॉट कॉमचा हेल्पलाईन क्रमांक गुगलवरून शोधणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगारांनी व्यक्तीची 47 हजार 908 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 25 डिसेंबर रोजी खराबवाडी येथे घडला.
सचिन पांडुरंग भोसले (46, रा. रावेत) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका मोबाईल क्रमांकधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले यांना कंपनीत कामावर असताना गाना डॉट कॉमच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यातून आपोआप 299 रुपये कमी झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे गाना डॉट कॉमचे ऑटो पे बंद करण्यासाठी गुगलवरून गाना डॉट कॉमचा कस्टमर केअर क्रमांक सर्च केला. तिथे त्यांना एक मोबाईल क्रमांक मिळाला. भोसले यांनी संबंधित क्रमांकावर फोन करून ऑटो पे बंद करण्याची माहिती दिली. फोनवरील व्यक्तीने भोसले यांच्या खात्यातून कमी झालेले 299 रुपये थोड्या वेळात परत करतो, असे सांगितले.

पैसे परत करण्याचा बहाणा करून फोनवरील व्यक्तीने भोसले यांच्याकडून बँकेची गोपनीय माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे भोसले यांच्या बँक खात्यातून आरोपीने 47 हजार 908 रुपये काढून घेत फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT