Market Update : लिंबू झाले स्वस्त सीताफळ, खरबूज महाग | पुढारी

Market Update : लिंबू झाले स्वस्त सीताफळ, खरबूज महाग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सरत्या वर्षाला निरोप देताना सामिष खाद्यपदार्थांवर ताव हे समीकरण बहुतांश ठिकाणी ठरलेलेच आहे. त्याअनुषंगाने रेस्टॉरंट, हॉटेलसह घरगुती ग्राहकांकडून लिंबाला मागणी वाढून चांगले दर मिळतील या अपेक्षेने रविवारी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात लिंबे विक्रीसाठी बाजारात पाठविली. गत आठवड्याच्या तुलनेत रविवारी लिंबाच्या आवकेत तब्बल दुपटीने वाढ झाली होती. मात्र, मागणी कमी पडल्याने लिंबाच्या 15 किलोंच्या गोणीमागे 50 रुपयांनी घसरण झाल्याची माहिती लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली. वाढत्या थंडीचा परिणाम खरबूजसह सिताफळांवर झाला आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने या फळांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने दर मागील आठवड्याच्या तुलनेत टिकून होते.

गुलटेकडी मार्केट यार्डमधील फळबाजारात रविवारी (दि. 31) केरळ येथून अननस 5 ट्रक, मोसंबी 50 ते 55 टन, संत्रा 50 ते 55 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबांची सुमारे 3 ते साडेचार हजार गोणी, कलिंगड 4 ते 5 टेम्पो, खरबूज 9 ते 10 टेम्पो, सीताफळ 25 ते 30 टन, चिक्कू 2 हजार बॉक्स आणि बोरांची 1700 गोणी इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 100-300, अननस (1 डझन): 100- 600 मोसंबी : (3 डझन): 170- 320, (4 डझन) : 100-170, संत्रा : (10 किलो) : 250-600, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 40-130, गणेश : 10-30, आरक्ता 10-50, कलिंगड : 10-16, खरबूज : 12- 25, पपई : 5-15, चिक्कू (दहा किलो) : 100-500. सीताफळ (एक किलो): 20-60, पेरु (वीस किलो) 300-500, बोरे (दहा किलो) चमेली: 180-220, उमराण: 70-100, चेकटन : 650-700, चण्यामण्या: 1000-120़.

Back to top button