पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 15 टक्के परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने 89 जणांची तब्बल 3 कोटी 39 लाख 12 हजार 637 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत सोपान पठारे, अंजली भरत पठारे ( रा. बोरीवली इस्ट), ज्ञानेश्वर आढाव उर्फ माऊली (रा. धनगरवाडी, ता. श्रीगोंदा), महेश चव्हाण (रा. दहिसर), अनुराग मिश्रा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अनुराधा रामनाथ शिंदे (वय 35, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2023 या दरम्यानच्या काळात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत आणि अंजली आणि ज्ञानेश्वर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आरोपींनी आपआपसात संगमत करून एफ ट्रेंड सेल्स एजन्सी प्रा. लिमिटेड मुंबई आणि एफ ट्रेंड सेल्स एजन्सी प्रा. लिमिटेड मुंबई- खराडी- पुणे कंपनीच्या माध्यमातून लोकांना फसवणुकीचा कट रचला.
आरोपींनी फिर्यादी आणि इतर 89 जणांना सांगितले, की त्यांच्या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 15 टक्के परतावा देण्यात येईल. सुरुवातीला काही प्रमाणात परतावा देण्यात आला. त्यानंतर कुठलाही परतावा न देता 89 जणांची 3 कोटी 39 लाख 12 हजार 637 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शंका आहे.
हेही वाचा