माजी भूमी अभिलेख उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा file photo
पुणे

Pune| माजी भूमी अभिलेख उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी नागपूर भूमी अभिलेखच्या तत्कालीन उपसंचालकासह पत्नीवर येरवडा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.

दादाभाऊ सोनू तळपे (वय ६२, रा. तत्कालीन उपसंचालक भूमी अभिलेख, नागपूर), पत्नी कल्पना दादाभाऊ तळपे (वय ५८, रा. दोघे हरमस हेरिटेज-११ येरवडा) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, दादाभाऊ तळपे हे भूमी अभिलेख विभागात नोकरीस होते. तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुणे एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशीर पद्धतीने संपादित केल्या आहेत की नाही?

याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, तळपे यांनी संपादित केलेल्य मालमत्तेबाबत उपयुक्त पुरावे ते सादर करू शकले नाहीत. त्यांनी भूर्म अभिलेख विभागात कार्यरत असतान आपल्या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वतःच्या व पत्नीच्या नावे २८ लाख ५२ हजार ५४१ (ज्ञात उत्पन्नापेक्षा १८.७४ टक्के) किमतीच अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

बेहिशोब मालमत्ता संपादित करण्यासाठी दादाभाऊ तळपे यांना त्यांची पत्नी कल्पना तळपे यांनी गुन्हा करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे पुणे एसीबीने दोघांवर येरवड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम १३(१) (ई), १३ (२) सह भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, भादंवि १०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT