पुणे : पुढारी वृत्तसेवा : गणेश मूर्तीच्या किमतीवरून वाद झाल्याने टोळक्याने विक्रेत्याला मारहाण करून स्टॉलची तोडफोड केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंगाराम टिकारामजी बावरी (वय 65, रा. एस. एम. जोशी महाविद्यालयाजवळ, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बावरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन अल्पवयीन मुलांसह रोहन शिवराज गुजर (वय 18), प्रसाद नारायण पाता (वय 18), सूरज व्यंकटसुखया देवरेड्डी (वय 20), कार्ती पिल्ले (वय 19) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावरी यांचा गणेश मूर्ती विक्रीचा स्टॉल आहे. एस. एम. जोशी महाविद्यालयाजवळील स्टॉलच्या परिसरात त्यांनी स्टॉल थाटला आहे. आरोपी मूर्ती खरेदी करण्यासाठी आले. मूर्तीच्या किमतीवरून आरोपींनी बावरी यांच्याशी वाद घातला. बावरी यांना शिवीगाळ करून स्टॉलची तोडफोड केली. सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.
हेही वाचा :