Blackmail Case of student File Photo
पुणे

Blackmail Case: अश्लील व्हिडीओ काढत विद्यार्थिनीला ब्लॅकमेलिंग

वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बारामती : महाविद्यालयीन तरुणीशी मैत्री करुन तिला कॅफेमध्ये नेत तिचा अश्लील व्हिडीओ काढण्यात आला. व्हीडीओ कॉल करत तिला कपडे काढण्यास सांगत त्याचे रेकॉर्डींग करण्यात आले. त्या आधारे तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटी व माहिती तंत्रज्ञान अधिनियमा नुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पार्थ शिंदे (रा. किल्लज, ता. तुळजापूर, जि. धाराशीव), रोहन चाबूकस्वार (रा. करंजेपूल, ता. बारामती), सूरज दत्तात्रय भोसले (रा. पुणे), हनुमंत शिंदे (रा. लातूर), विजय मोजगे (रा. किल्लज, ता. तुळजापूर) व तुषार जगदाळे (पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 19 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे.डिसेंबर 2024 मध्ये पिडीतेच्या एका मैत्रिणीने तिची पार्थ याच्याशी ओळख करून दिली होती. त्यानंतर फिर्यादी व पार्थ या दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. त्यावरून त्यांचे बोलणे होऊ लागले.

जानेवारी 2025 मध्ये वाढदिवस असताना त्याने तिला निरा (ता. पुरंदर) येथील एका कॅफेमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर 16 जानेवारी रोजी ती महाविद्यालयात असताना पार्थ याने तिला फोन करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादीने त्यास नकार दिला असता त्याने वेळोवेळी शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर करंजेपूल येथील एका कॅफेमध्ये भेटल्यावर तिच्या नकळत तिचा व्हिडीओ काढला. तिचा विनयभंग करण्यात आला. व्हिडीओ घरच्यांना पाठवण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले गेले. पार्थ व रोहन या दोघांनी तिचा घराच्या गेटपर्यंत पाठलाग केला.

पार्थ याने त्यानंतर ब्लॅकमेल करत व्हाट्स अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल केला. तिला कपडे काढण्यास भाग पाडत तिचे व्हिडीओ तयार केले. रिलेशन न ठेवल्यास सदर व्हिडीओ तुझ्या नातेवाईकांना पाठवेन, अशी धमकी देत शरीरसुखाची मागणी केली. पार्थ शिंदे याने फिर्यादीच्या नातेवाईकांना तिच्याबद्दल उलटसुलट सांगत तिच्यासोबत काढलेले फोटो तसेच ती अन्य एका मुलासोबत कॅफेमध्ये बसली असताना नकळत काढलेले फोटो, तसेच त्याच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो व नग्न व्हिडिओ पाठवले. हनुमंत शिंदे याने त्याच्या मोबाईलवरून फिर्यादीच्या बहिणीला फोटो व नग्न व्हिडीओ पाठवले.

29 जून रोजी पार्थ, रोहन, सूरज, हनुमंत, विजय व तुषार या सर्वांनी तिची बहिण व नातेवाईकांना फोटो, व्हिडीओ पाठवले. तिच्या बहिणीला फोन केला. ती माझ्याशी दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असताना आणखी चार-पाच मुलांसोबत रिलेशन ठेऊन असल्याचे पार्थ याने सांगितले. रोहन याने तिला फोन करून शिवीगाळ, दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड याप्रकरणी तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT