पुणेः बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे २३ ते २६ डिसेंबर दरम्यान राज्यात थंडीचा कडाका किंचित कमी होण्याची शक्यता आहे.दरम्यान सोमवारी अहिल्यानगर ७.३,पुणे ८.६ अंशावर होते.
राज्यात गत पंधरा दिवसांपासून थंडीची लाट सक्रीय असून ती पारा ७ ते ११ अंशावर होता.प्रामुख्याने मध्य,उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा अन विदर्भात कडाक्याची लाट सुरु आहे.मात्र बुधवार (२३ डिसेंबर) पासून ही लाट किंचित कमी होण्याची शक्यता आहे.कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उबदार वारे महाराष्ट्रात येत आहे.त्यामुळे २३ ते २६ असे तीन ते चार दिवस कडाक्याच्या थंडीपासून सुटका होण्याची शक्यता आहे
अहिल्यानगर ७.३,पुणे ८.६,जळगाव ९.५,कोल्हापूर १५.३, महाबळेश्वर १२.१, मालेगाव ८.४, नाशिक ८.८, सांगली १३, सातारा ११.२, सोलापूर १४.१, धाराशिव १०.७, छ.संभाजीनगर १०.५, परभणी १०.६, नांदेड १०, अकोला १०.९, अमरावती १०.८, बुलढाणा १२.६, ब्रम्हपुरी १२, चंद्रपूर १२.८, गोंदिया ८.४, नागपूर ९.२, वाशीम ११.४, वर्धा ११.४, यवतमाळ ९.६.