पुणे

नागरिकांना लागले परदेश वारीचे वेध

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : उच्च शिक्षण, इंटर्नशिप, नोकरी, व्यवसाय, पर्यटन अथवा परदेशातील नातेवाइकांची भेट आदींसह विविध कारणांसाठी पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरामधून एकूण 3 लाख 10 हजार 159 नागरिकांनी पासपोर्ट काढलेत. यावरून अनेक नागरिकांना परदेश वारीचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांमधील ही आकडेवारी असून, कोरोनानंतर दरवर्षी पासपोर्ट काढणार्‍यांच्या संख्येत सुमारे पन्नास टक्क्यांची भर पडत असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना महामारी नंतर देशासह आंततराष्ट्रीय स्तरावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याकारणाने 2021 मध्ये 2 लाख 31 हजार 346 नागरिकांनी पासपोर्ट काढले असून, दुसर्‍या वर्षी पासपोर्ट काढणार्‍यांची संख्या 3 लाख 44 हजार 447 एवढी आहे. त्यानुसार गेल्यावर्षीच्या म्हणजे 2022 मधील पहिल्या आठ महिन्यातील आकडेवारी पाहता, यावर्षी 40 टक्यांची वाढ होऊन 88 हजार 675 नागरिकांनी पासपोर्ट काढले आहेत.

या कारणांसाठी अर्ज

शिक्षणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. त्याचबरोबर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर इंटर्नशिप किंवा नोकरीसाठी विद्यार्थी परदेशात जात असून, त्यांच्या भेटीसाठी नातेवाईकदेखील जातात. तसेच अनेक नागरिकांचा पर्यटनाकडे कल असल्याने अनेक पर्यटक पासपोर्टसाठी अर्ज करत आहेत.

कोरोनानंतर वाढला टक्का

कोरोना काळात घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचे पर्यटन थांबले होते. कोरोना काळातील भयावह परिस्थितीमुळे कुटूंबासह फिरण्याचे वेध अनेकांना लागल्याने दरवर्षी पोसपोर्ट काढणार्‍या नागरिकांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT