पुणे

पुणे जिल्ह्यातील चिल्हेवाडी धरण ‘ओव्हरफ्लो’; मांडवी नदी दुथडी भरून

अमृता चौगुले

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील चिल्हेवाडी (ता. जुन्नर) धरण परिसरात गेली आठ दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार कोसळत आहे. परिणामी, चिल्हेवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहून सांडव्याद्वारे मांडवी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. गत वर्षीच्या तुलनेत ओतूर आणि परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे.

पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला तरी अद्यापही या भागात मुसळधार पाऊस झालेला नाही. परिणामी, भूभागातील पाणीपातळी 'जैसे थे'च आहे. चिल्हेवाडी धरण भरल्यामुळे व मांडवी नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे या भागातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मांडवी नदीला आलेल्या पाण्यामुळे केटी बंधारे वाहू लागले असून, तूर्तास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT