Chief Minister Shinde in Alandi today for Maulis palanquin departure ceremony
मुख्यमंत्री इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची करणार पाहणी  File Photo
पुणे

माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज आळंदीत

पुढारी वृत्तसेवा

आळंदी : पुढारी वृत्तसेवा

संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीत येणार आहेत. दुपारी तीन वाजता ते आळंदीत असणार आहेत. यावेळी ते पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणार असून, त्यानंतर इंद्रायणी नदी प्रदूषणाची देखील पाहणी करणार आहेत.

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पालखी सोहळ्यात मंदिरात येत दर्शन घेतले होते; मात्र मुख्यमंत्री प्रस्थान सोहळ्यात येण्याची पहिलीच वेळ आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात याबरोबरच पालखी सोहळ्यातील दिंड्यांना २० हजार रूपयांचे अनुदान वाटप बाबत टिकेची झोड उटल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आळंदी नगरपरिषद तुळशी वृंदावन उद्यानाचे उदघाटन, वारकरी छत्री व रेनकोट वाटप या कार्यक्रमांना देखील ते हजेरी लावतील, असे सांगण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे आळंदीत असणार आहेत.

SCROLL FOR NEXT