पुणे

आधी वाहतूक बदल पाहा, मगच कोरेगाव पार्कात जा!

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने मंगळवारी कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे इथे जाताना वाहतूक बदलाची माहिती घ्या,  असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.  कोरेगाव पार्क येथे मतमोजणी होणार असल्याने येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी व अन्य नागरिक यांची वाहने येणार आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये.
तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी मंगळवारी पहाटे  5 ते सायंकाळी निकाल लागेपर्यंत वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेता अत्यावश्यक कोरेगाव पार्क परिसरात तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये ब्लु डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौकदरम्यान हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सोडली जाईल. यासाठी नॉर्थ मेन रोड व अंतर्गत गल्ल्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

इथे पार्किंग व्यवस्था आहे; मात्र केवळ सरकारी कर्मचारी व मतमोजणी प्रतिनिधींसाठी

  • पूज्य कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रोड कोरेगाव पार्क येथे 600 ते 700 दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी
  • रोही व्हिला लॉन्स लेन नं.7 कोरेगाव पार्क येथे 600 ते 700 दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी
  • दी पूना स्कूल अ‍ॅन्ड होम फॉर द ब्लांइड ट्रस्ट, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क

हेही वाचा

SCROLL FOR NEXT