पुणे

पुणे शहरात आजपासून पावसाची शक्यता

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात रविवारपासून (दि.16) गुरुवारपर्यंत (दि.20) पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. 18 व 19 रोजी शहरात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. यंदा 15 जुलैपर्यंत शहरात 46 टक्के, तर जिल्ह्यात 34 टक्के पावसाची तूट आहे. जूनमध्ये शहरात 68 टक्के पावसाची तूट होती. जुलैमध्ये पावसाचा अंदाज होता. मात्र, 14 जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्याने जुलैची सरासरी घटली.

25 जूनपासून शहरात मान्सून बरसण्यास सुरुवात झाली. जुलैमध्येही शहरात पावसाची रिमझिमच सुरू आहे. त्यामुळे जुलैच्या सरासरीत शहर मागे आहे. 15 जुलैअखेर पुणे जिल्ह्यात पावसाची सरासरी उणे 34 टक्के, तर शहरात उणे 46 टक्के इतकी आहे. मात्र, आगामी आठवड्यात ही तूट भरून निघेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. 17 ते 22 जुलै या कालावधीत शहरात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे.

येत्या पाच दिवसांत शहरात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज आहे. 16 जुलैला हलका पाऊस होईल, तर 17 ते 22 जुलैपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
             -डॉ.के.एस. होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, आयएमडी,पुणे

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT