Vegetable Pudhari
पुणे

Chakan Vegetable Market Prices: आषाढी एकादशीचा भाजीबाजारावर परिणाम; चाकण बाजारात तरकारीच्या दरात मोठी घसरण

ग्राहकांनी फिरवली पाठ; कांदा, दोडका, काकडी, हिरवी मिरचीची मोठी आवक, पालेभाज्यांचेही दर घसरले

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये आषाढी एकादशीमुळे तरकारीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने भावात मोठी घसरण झाली. कांदा, दोडका, हिरवी मिरची व काकडीची मोठी आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, मेथी व पालक भाजीच्या दरात घसरण झाली. एकूण उलाढाल ५ कोटी ४० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १ हजार ४०० क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १,२०० ते २,८०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,९०० क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव १,४०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ३५ क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव १५ हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २६० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे - कांदा - एकूण आवक - १,४०० क्विंटल. भाव क्रमांक - १. २,८०० रुपये, भाव क्रमांक २. २,३०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये, बटाटा- एकूण आवक-‌ १,९०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,४०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ७०० रुपये.

फळभाज्या-एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे - टोमॅटो - २७२ क्विंटल (१,००० ते २,२००), कोबी - १५५ क्विंटल (१,००० ते १,५००), फ्लॉवर - १७० क्विंटल (८०० ते १,२००), वांगी - ६४ क्विंटल (१,००० ते २,०००), भेंडी - ६४ क्विंटल (२,००० ते ३,०००), दोडका - ४५ क्विंटल (२,००० ते ३,०००), कारली - ५८ क्विंटल ( १,००० ते २,०००), दुधीभोपळा - ३२ क्विंटल (१,००० ते २,०००), काकडी - ८५ क्विंटल (८०० ते १,२००), फरशी - १४ क्विंटल (३,००० ते ५,०००), वालवड - २४ क्विंटल (३,००० ते ५,०००), ढोबळी मिरची - ११२ क्विंटल (२,५०० ते ४,५००), चवळी - २४ क्विंटल (१,५०० ते २,५००), शेवगा - १० क्विंटल (३,००० ते ४,०००), गाजर - १५५ क्विंटल (१,५०० ते २,५००), गवार - ३४ क्विंटल (४,००० ते ६,०००), आले - १३० क्विंटल (१०,००० ते १५,०००).

पालेभाज्या-पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे-मेथी - एकूण १० हजार १८० जुड्या (१,००० ते २,००० रुपये), कोथिंबीर-एकूण १६ हजार ७४५ जुड्या (१,००० ते २,५०० रुपये), शेपू-एकूण ३ हजार ५४९ जुड्या (७०० ते १,२०० रुपये), पालक-एकूण ३ हजार ५७ जुड्या (८०० ते १,५०० रुपये).

जनावरे-जनावरांच्या बाजारात ३० जर्सी गायींपैकी २५ गायींची विक्री झाली. (१५,००० ते ७०,००० रुपये), ५५ बैलांपैकी ४५ बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ४०,००० रुपये), ९० म्हशीं पैकी ८० म्हशींची विक्री झाली. (३०,००० ते ८०,००० रुपये), ११,००० शेळ्या-मेंढ्यापैकी ९,५.०० शेळ्यांची विक्री झाली. त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT