चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची मोठी आवक झाली. कोबी, भेंडी, रताळे, गवार, कांदा, वांगी, शेवगा, वाटाणा, हिरवी मिरचीची देखील भरपूर आवक झाली. लसणाचे भाव कडाडले. पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, पालक व मेथीची आवक वाढल्याने भाव गडगडले. एकूण उलाढाल 6 कोटी 10 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली. कांद्याची एकूण 9 हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला कमालभाव 1,500 रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक 2,500 क्विंटल झाली. बटाट्याला 1,300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 250 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 7 हजार रुपयांपासून ते 9,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे:
कांदा- एकूण आवक- 9,000 क्विंटल.
भाव क्रमांक- 1.1500 रुपये,
भाव क्रमांक 2. 1,000 रुपये,
भाव क्रमांक 3. 800.
बटाटा - एकूण आवक - 2,500 क्विंटल,
भाव क्रमांक 1. 1,300,
भाव क्रमांक 2. 1,000
फळभाज्या-एकूण आवक क्विंटल मध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे:
टोमॅटो- 350 क्विंटल (800 ते 1,400), कोबी- 225 क्विंटल (600 ते 1,000), फ्लॉवर- 190 क्विंटल (1,000 ते 1,600), वांगी- 72 क्विंटल (2,000 ते 3,000), भेंडी- 84 क्विंटल (2,000 ते 3,500), दोडका- 54 क्विंटल (4,000 ते 5,000).
कारली- 81 क्विंटल (3,500 ते 4,500), दुधीभोपळा- 52 क्विंटल (1,500 ते 2,500), काकडी- 85 क्विंटल (1,000 ते 2,000), फरशी- 52 क्विंटल (1,500 ते 2,500), वालवड- 58 क्विंटल (1,000 ते 3,000), ढोबळी मिरची- 168 क्विंटल (3,000 ते 5,000), चवळी- 42 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा- 365 क्विंटल (2,400 ते 2,800), गाजर- 170 क्विंटल (1,000 ते 1,800), गवार- 29 क्विंटल 7,000 ते 10,000), अद्रक- 150 क्विंटल (3,500 ते 4,500), रताळी- 385 क्विंटल ( 1,500 ते 2,500).
पालेभाज्या: पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे:
मेथी-एकूण 26 हजार 536 जुड्या (800 ते 1,200 रुपये), कोथिंबीर- एकूण 44 हजार 410 जुड्या (600 ते 1,200 रुपये), शेपू- एकूण 4 हजार 785 जुड्या (400 ते 700 रुपये), पालक- एकूण 4 हजार 485 जुड्या (400 ते 700 रुपये).
जनावरे: जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 40 जर्सी गायींपैकी 35 गायींची विक्री झाली. (15,000 ते 70,000 रुपये), 90 बैलांपैकी 65 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये), 120 म्हशींपैकी 90 म्हशींची विक्री झाली. (30,000 ते 80,000 रुपये), 7,000 शेळ्या मेंढ्यापैकी 6 हजार 400 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.