Baramati Post Office Digital Payments: बारामती टपाल कार्यालयांत डिजिटल पेमेंटला जोरदार प्रतिसाद

क्यूआर कोड व यूपीआय व्यवहारांत वाढ; दोन महिन्यांत दहा लाखांहून अधिक महसूल जमा
Post Office Digital Payments
Post Office Digital PaymentsPudhari
Published on
Updated on

बारामती: भारतीय टपाल खात्याच्या डायनॅमिक क्यूआर कोडद्वारे फोन पे, गुगल पे आणि तत्सम यूपीआय पेमेंट्‌‍सच्या माध्यमातून आणि एसबीआय पीओएस मशिनद्वारे केल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंटच्या सुविधेला ग््रााहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Post Office Digital Payments
Takli Haji Gram Panchayat Land Dispute: टाकळी हाजी ग्रामपंचायतीची जमीन ४० वर्षांनंतर परत; बेकायदेशीर नोंद रद्द

डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे बारामती मंडलाचे टपाल अधीक्षक केतन शित्रे यांनी सांगितले. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये बारामती विभागात पाच तालुक्यांतील विविध टपाल कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने डिजिटल व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Office Digital Payments
Pune PMFME Scheme Projects: पीएमएफएमई योजनेतून पुणे जिल्ह्यात २५० प्रकल्प कार्यान्वित; ४६ कोटींची गुंतवणूक

स्पीड पोस्ट पत्र, पार्सल, मनी ऑर्डर, बिलभरणा, तिकीट विक्री, फिलाटेली तिकिटांची खरेदी तसेच फँकिंग मशिन रिचार्ज, ग््राामीण डाक जीवनविमा, डाक जीवनविमा या सर्व सेवांसाठी ग््रााहकांना आता क्यूआर कोड स्कॅन करून किंवा डेबिट कार्ड वापरून डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याची अतिरिक्त सुविधा प्रत्येक टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Post Office Digital Payments
Baneshwar Temple Mahashivratri: महाशिवरात्रीनिमित्त नसरापूरच्या बनेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

नोव्हेंबर महिन्यात एकूण सुमारे 4,961 हजारांहून अधिक डिजिटल व्यवहार झाले. त्याद्वारे सुमारे 3,48,610 रुपये महसूल जमा झाला. डिसेंबर महिन्यात ही संख्या आणखी वाढली. 8,643 जास्त व्यवहारांमुळे महसूल 6,43,586 रुपयांपर्यंत पोहचला. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात डिजिटल व्यवहारांमधून सुमारे 10 लाखापेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला. मागील तिमाहीमध्ये एकूण 13 हजार व्यवहारांमधून सुमारे 12 लाख महसूल मिळाला.

Post Office Digital Payments
Pune Municipal Election Analysis: धनकवडी–कात्रज डेअरी प्रभागात भाजपचा झेंडा; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग््रााहकांचा वेळ वाचत असून, रोख रक्कम तसेच सुट्टे पैसे जवळ ठेवण्याचा त्रास वाचला आहे. त्यामुळे काउंटरवर व्यवहार करणे अधिक सुलभ झाले आहे. डिजिटल व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून, ‌’तुमचा मोबाईलच तुमचे पाकीट!‌’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणे शक्य झाले आहे. पुढील काळात या डिजिटल पेमेंटचा वापर अधिक वाढेल आणि ‌’डिजिटल इंडिया‌’च्या उपक्रमाला अधिक हातभार लागेल, असा विश्वास शित्रे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news