अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये चवळी, शेवगा, भेंडी, फ्लाॅवर, दोडका, कारली व हिरव्या मिरचीची उच्चांकी आवक झाली. फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव तेजीत राहिले. एकूण उलाढाल ५ कोटी ६० लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक १ हजार ५०० क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १,००० ते २,७०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,६०० क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव १,५०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव १५ हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३३५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ४ हजार रुपयांपासून ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा - एकूण आवक - १,५०० क्विंटल. भाव क्रमांक - १. २,७०० रुपये, भाव क्रमांक २. २,००० रुपये, भाव क्रमांक ३. १,०००. बटाटा - एकूण आवक - १,६०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,५०० रुपये, भाव क्रमांक २. १,३०० रुपये, भाव क्रमांक ३. ९०० रुपये.
फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे - टोमॅटो - ३४२ क्विंटल (१,००० ते २,५००), कोबी - २१५ क्विंटल (८०० ते १,५००), फ्लॉवर - २१० क्विंटल (१,००० ते २,०००), वांगी - ८६ क्विंटल (२,००० ते ४,०००), भेंडी - ६८ क्विंटल (३,००० ते ५,०००), दोडका - ६५ क्विंटल (३,००० ते ४,०००), कारली - ६२ क्विंटल (३,००० ते ४,०००), दुधीभोपळा - ५० क्विंटल (१,००० ते २,०००), काकडी - १०९ क्विंटल (१,००० ते २,०००), फरशी - ६ क्विंटल (७,००० ते १२,०००), वालवड - १४ क्विंटल (६,००० ते ८,०००), ढोबळी मिरची - १५० क्विंटल (३,००० ते ४,०००), चवळी - २८ क्विंटल (२,५०० ते ३,५००), वाटाणा - १५ क्विंटल (१२,००० ते १५,०००), शेवगा - ३० क्विंटल (४,००० ते ५,५००), गाजर - १४० क्विंटल (१,५०० ते २,५००), गवार - ५० क्विंटल (४,००० ते ६,०००), आले - १७५ क्विंटल (८,००० ते १३,०००).
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी - एकूण १२ हजार १८० जुड्या (१,००० ते १,५०० रुपये), कोथिंबीर - एकूण १७ हजार ५३० जुड्या (१,५०० ते २,५०० रुपये), शेपू - एकूण ३ हजार ८५० जुड्या (१,००० ते १,५०० रुपये), पालक - एकूण ३ हजार ७४९ जुड्या (७०० ते १,४०० रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३० जर्सी गायींपैकी २५ गायींची विक्री झाली ( १५,००० ते ७०,००० रुपये), ४५ बैलांपैकी ३५ बैलांची विक्री झाली (१०,००० ते ४०,००० रुपये), ११० म्हशींपैकी ९० म्हशींची विक्री झाली (३०,००० ते ८०,००० रुपये), ८,७०० शेळ्या-मेंढ्यांपैकी ८,४०० शेळ्यांची विक्री झाली. त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.