अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीने तरकारीची आवक घटली. कांद्याची आवक देखील घटली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शेळ्या-मेंढ्या व बोकड बाजारात मोठी उलाढाल झाली. एकूण उलाढाल 13 कोटी 20 लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक 1 हजार क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव 700 ते 1,300 रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक 1,400 क्विंटल झाली. बटाट्याला कमालभाव 900 ते 1,400 रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. लसणाला 10 हजार रुपये कमालभाव मिळाला. शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे-कांदा- एकूण आवक- 1,000 क्विंटल. भाव क्रमांक- 1. 1,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,100 रुपये, भाव क्रमांक 3. 700. बटाटा- एकूण आवक- 1400 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,400 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 900 रुपये.
फळभाज्या: आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे: टोमॅटो- 306 क्विंटल (1,400 ते 2,000), कोबी- 180 क्विंटल (600 ते 1,000), फ्लॉवर- 170 क्विंटल (1,000 ते 1,500), वांगी- 84 क्विंटल (1,500 ते 2,500), भेंडी- 76 क्विंटल (2,500 ते 3,500), दोडका- 54 क्विंटल (2,500 ते 3,500), कारली- 66 क्विंटल (3,000 ते 4,000), दुधीभोपळा- 48 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी- 84 क्विंटल (1,500 ते 2,500), फरशी- 14 क्विंटल (8,000 ते 10,000), वालवड- 24 क्विंटल (5,000 ते 7,000), ढोबळी मिरची- 142 क्विंटल (6,000 ते 7,000), चवळी- 35 क्विंटल (1,000 ते 3,500), वाटाणा- 40 क्विंटल (6,000 ते 8,000), शेवगा- 45 क्विंटल (1,500 ते 2,500), गाजर- 210 क्विंटल (1,000 ते 2,000), गवार- 88 क्विंटल (2,500 ते 4,000), आले- 170 क्विंटल (4,000 ते 5,000).
पालेभाज्या: आवक जुड्यांमध्ये व मिळालेले भाव पुढीलप्रमाणे: मेथी- एकूण 9 हजार 120 जुड्या (1,500 ते 2,200 रुपये), कोथिंबीर- एकूण 19 हजार 980 जुड्या (1,000 ते 1,800 रुपये), पालक- एकूण 2 हजार 931 जुड्या (1,000 ते 1,500 रुपये).
जनावरे: बाजारात 35 जर्सी गायी (15,000 ते 70,000 रुपये), 50 बैल (10,000 ते 40,000 रुपये), 70 म्हशींची विक्री झाली. (30,000 ते 80,000 रुपये), 25,000 शेळ्या-मेंढ्यापैकी 20,000 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजारात 30 हजार बोकडांची आवक झाली. त्यापैकी 27 हजार बोकडांची विक्री झाली. बोकडांना 15 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत भाव मिळाला.