Onion Pudhari
पुणे

Chakan Onion Market Rates: चाकण मार्केट यार्डमध्ये कांदा २०० रुपयांनी घसरला; भाजीपाल्याचे दर कडाडले

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत ९,५०० क्विंटल कांद्याची आवक; पालेभाज्यांना तेजीत भाव, एकूण उलाढाल ६.७५ कोटी रुपये

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे कांद्याचे भाव प्रतिक्विंटलला 200 रुपयांनी घसरले. वाटाणा, गाजर, हिरव्या मिरचीची भरपूर आवक झाली. वांगी, भेंडी, दोडका, चवळी, कोबी, फ्लॉवर व भोपळ्याचे भाव कडाडले. लसणाची किरकोळ आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, पालक व मेथीची प्रचंड आवक होऊनही भाव तेजीत राहिले. एकूण उलाढाल 6 कोटी 75 लाख रुपये झाली.

कांद्याची एकूण 9 हजार क्विंटल 500 आवक झाली. कांद्याला सरासरी 1 हजार, तर कमाल भाव 1,300 रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. बटाट्याला 1,200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 317 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 6 हजार रुपयांपासून ते 7,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा - एकूण आवक - 9,500 क्विंटल. भाव क्रमांक - 1. 1,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 800. बटाटा - एकूण आवक - 1,500 क्विंटल, भाव क्रमांक 1. 1,200,. भाव क्रमांक 2. 800 रुपये, भाव क्रमांक 3. 700 रुपये.

फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे : टोमॅटो - 331 क्विंटल (800 ते 1,000), कोबी - 241 क्विंटल (400 ते 500), फ्लॉवर - 205 क्विंटल (1,000 ते 1,200), वांगी - 83 क्विंटल (2,000 ते 2,500), भेंडी - 87 क्विंटल (3,000 ते 3,500), दोडका - 64 क्विंटल (4,000 ते 4,500), कारली - 82 क्विंटल (3,000 ते 3,500) दुधीभोपळा - 66 क्विंटल (1,000 ते 1,500), काकडी - 106 क्विंटल (800 ते 1,000), फरशी - 42 क्विंटल (1,500 ते 2,000), वालवड - 73 क्विंटल (1,000 ते 1,500), ढोबळी मिरची - 168 क्विंटल (3,000 ते 3,500), चवळी - 33 क्विंटल (2,000 ते 2,500), वाटाणा - 310 क्विंटल (2,200 ते 2,400), गाजर - 155 क्विंटल (1,000 ते 1,300), गवार - 25 क्विंटल 7,000 ते 8,000), आले - 170 क्विंटल (3,500 ते 4,000).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी - एकूण 16 हजार 272 जुड्या (1,000 ते 1,300 रुपये), कोथिंबीर - एकूण 36 हजार 864 जुड्या (500 ते 800 रुपये), शेपू - एकूण 3 हजार 285 जुड्या (600 ते 800 रुपये), पालक - एकूण 2 हजार 619 जुड्या (500 ते 800 रुपये).

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 40 जर्सी गाईंपैकी 30 गाईंची विक्री झाली. (15,000 ते 70,000 रुपये), 90 बैलांपैकी 65 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये), 120 म्हशींपैकी 95 म्हशींची विक्री झाली. (30,000 ते 80,000 रुपये), 10,100 शेळ्यामेंढ्यांपैकी 9 हजार 500 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT