Vegetable Pudhari
पुणे

Chakan Vegetable Market: चाकण बाजारात कांद्याचे भाव वाढले; आवक घटल्याने दर तेजीत, भाजीपाल्याला विक्रमी मागणी

महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा महागला; भोपळा, मिरची, वाटाणा यांची मोठी आवक, तर गाजर-वांगी-भेंडीचे भावही चढेच

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटली. त्यामुळे भावात वाढ झाली. भोपळा, हिरवी मिरची, वालवड, वाटाणा व दुधीभोपळ्याची विक्रमी आवक झाली. गाजर, वांगी, भेंडी, चवळी, टोमॅटो व कोबीचे भाव तेजीत राहिले. फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव वधारले आहेत. एकूण उलाढाल ५ कोटी ८० लाख रुपये झाली.

कांद्याची एकूण आवक १ हजार २०० क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव १,००० ते २,६०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या तीन आठवड्यांपासून बटाट्याचा कमालभाव १,५०० रुपयांवरच स्थिरावला आहे. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. लसणाला १५ हजार रुपये कमालभाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २९५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ४ हजार रुपयां पासून ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे-कांदा- एकूण आवक- १,२०० क्विंटल. भाव क्रमांक- १. २,६०० रुपये, भाव क्रमांक २. २,००० रुपये, भाव क्रमांक ३. १,०००. बटाटा- एकूण आवक-‌ १,५०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,५०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.

फळभाज्या-एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे- टोमॅटो- ३२९ क्विंटल (१,००० ते २,५००), कोबी- १८० क्विंटल (१,५०० ते २,०००), फ्लॉवर- १९० क्विंटल (१,५०० ते २,०००), वांगी- ९६ क्विंटल (१,५०० ते २,५००), भेंडी- ७१ क्विंटल (३,००० ते ४,०००), दोडका- ६८ क्विंटल (३,००० ते ४,५००), कारली- ७७ क्विंटल (३,००० ते ४,०००), दुधी भोपळा- ५० क्विंटल (१,००० ते २,०००), काकडी- ११५ क्विंटल (१,००० ते २,५००), फरशी- ६ क्विंटल (८,००० ते १०,०००), वालवड- ६ क्विंटल (६,००० ते ८,०००), ढोबळी मिरची- १५६ क्विंटल (४,००० ते ६,०००), चवळी- ४८ क्विंटल (२,००० ते ३,५००), वाटाणा- १० क्विंटल (१०,००० ते १३,०००), शेवगा- ३३ क्विंटल (४,००० ते ६,०००), गाजर- १३० क्विंटल (१,५०० ते २,५००), गवार- ५४ क्विंटल (३,००० ते ६,०००), आले- १६० क्विंटल (७,००० ते ९,०००).

पालेभाज्या-पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे-मेथी-एकूण ७ हजार ९६५ जुड्या (१,४०० ते २,२०० रुपये), कोथिंबीर-एकूण २१ हजार ७४५ जुड्या (१,२०० ते २,००० रुपये), शेपू-एकूण ३ हजार ५४ जुड्या (१,००० ते १,५०० रुपये), पालक-एकूण ३ हजार ९३७ जुड्या (७०० ते ९०० रुपये).

जनावरे-जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४० जर्सी गायींपैकी ३५ गायींची विक्री झाली. (१५,००० ते ७०,००० रुपये). ६० बैलांपैकी ५० बैलांची विक्री झाली (१०,००० ते ४०,००० रुपये). ११० म्हशींपैकी ९५ म्हशींची विक्री झाली (३०,००० ते ८०,००० रुपये). ९,८०० शेळ्या-मेंढ्यांपैकी ९,६०० शेळ्यांची विक्री झाली. त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT