पुणे

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर आणखी एक सिग्नल

backup backup

चाकण : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कांडगे कमानजवळील भागात आणखी एक सिग्नल बसविण्यात आला
आहे. महामार्गावरून थेट बाजार समितीच्या चाकण मार्केटमध्ये जाण्यासाठी सोय व्हावी, यासाठी या भागात दुभाजक काढून गुरुवारी
(दि. 5) हा सिग्नल कार्यान्वित करण्यात आला.

चाकण वाहतूक विभागाकडून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बदलांचे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे कार्यान्वित करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी दुभाजक काढून, गतिरोधक बसवून वाहने वळविण्यात येत
आहेत.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या संकल्पनेतून पुणे-नाशिक महामार्गावर चाकण मार्केटच्या सोयीसाठी कांडगे कमान भागात साकारलेल्या वाहतूक नियंत्रण दिव्यांचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT